Monday, April 15, 2024

“हात तर जोडलेच आहे आता काय…”,म्हणत अमिताभ बच्चन यांचे ‘या’ महत्वाच्या व्यक्तीला गाऱ्हाणे

ट्विटर आजच्या सोशल मीडियाच्या काळातील सर्वात महत्वाचे अँप आहे. अनेक लहान मोठे दिग्गज लोकं ता माध्यमाचा सर्रास वापर करतात. राजकारणी, खेळाडू, कलाकार, समाजसेवक आदी अनेक विविध क्षेत्रातील दिग्गज यावर उपलब्ध असून, ट्विटरच्या माध्यमातून ते लोकांच्या संपर्कात तर असतात सोबतच त्यांचे विचार आणि मतं देखील ते यावर मांडत असतात. संपूर्ण जगभार्त ट्विटरचा वापर केला जातो. अशा या लोकप्रिय सोशल मीडिया कंपनीचे हेड एलॉन मस्क असून जेव्हा पासून ते या कंपनीचे कर्ताधर्ता झाले तेव्हापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले.

आता ट्विटरमध्ये एक नवीन आणि मोठा बदल दिसून येत आहे, आणि तो म्हणजे अनेक दिग्गज लोकांच्या नावापुढे असणारी ब्लु टिक काढून टाकण्यात आली आहे. संपूर्ण जगातील अनेक दिग्गज मान्यवर, राजकीय नेते, कलाकार, खेळाडू आदी अनेक लोकांच्या ट्विटर अकाउंटवर असणारी ही ब्लु टिक हटवण्यात आली आहे. याला उभारत देखील अपवाद नाही. भारतात सुद्धा मोठ्या नेत्यांसोबतच किंग खान शाहरुख खान , विराट कोहली, सलमान खान, अमिताभ बच्चन यांच्या नावापुढील ब्लु टीका काढण्यात आली आहे.

यामुळे आता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एका खास इलाहबादी आणि मजेशीर शैलीमध्ये एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, “ऐ ट्विटर दादा, ऐकतोय का? आता आम्ही पैसे सुद्धा दिले आहेत…तर आता ते जे आमच्या नावापुढे निळे कमळ लावतात ते पुन्हा लावून द्या ना, म्हणजे लोकांना समजेल तरी की मीच अमिताभ बच्चन आहे, हात तर जोडलेच आहे आता काय पाया पण पडू का? “

त्यांच्या या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी उत्तर दिले आहे. काही लोकांनी तर त्यांच्याच शैलीत त्यांना उत्तर दिले आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट तुफान गाजत आहे. अमिताभ बचनन सर्वात जास्त ट्विटरवर सक्रिय असतात. ते न चुकता ट्विट करत त्यांच्या फॅन्सला विविध अपडेट देत असतात. त्यामुळे एका ट्विटमध्ये तर त्यांनी एलॉन मस्कला काही गोष्टी ट्विटरमध्ये जोडण्याची विनंती देखील केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

हे देखील वाचा