Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड अमिताभ यांचे ‘बच्चन’ आडनाव पडले तरी कसे? रंजक आहे किस्सा

अमिताभ यांचे ‘बच्चन’ आडनाव पडले तरी कसे? रंजक आहे किस्सा

सध्या मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘उंचाई‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, बिग बी ‘कौन बनेगा करोडपती सीझन 14‘ देखील होस्ट करत आहेत. जिथे ते अनेकदा स्पर्धकांसोबत मस्करी करताना दिसतात आणि कधी कधी काही मनोरंजक खुलासे देखील करतात. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्येही असंच काहीसं घडलं आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘बच्चन’ आडनावाबद्दल खुलासा केला, ते कुठून आले आणि ते त्यांच्या नावासमोर का लावतात, याविषयी त्यांनी सांगितले.

आपल्या आयुष्यातील हा मनोरंजक किस्सा सांगताना अभिनेता अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) म्हणाले की, “बच्चन आडनाव हे त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांची देणगी आहे, ही त्यांच्या विचारसरणीची निर्मिती आहे.” बिग बी म्हणाले की, “त्यांच्या वडिलांना स्वतःला जातीच्या बंधनातून मुक्त ठेवायचे होते. कवी असल्यामुळे त्यांना बच्चन हे टोपणनाव मिळाले. मला शाळेत प्रवेश मिळाला तेव्हा शिक्षकांनी माझ्या पालकांना माझे आडनाव काय असे विचारले. याच क्षणी माझ्या वडिलांनी ठरवले की, माझे आडनाव बच्चन असेल आणि मी बच्चन होण्याचं पहिले उदाहरण बनलाे.”

गुरुग्राममधील आलेली स्पर्धक रुची हिच्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हा किस्सा शेअर केला. रुचीचे आडनाव न वापरण्याचे कारण जाणून बिग बी खूप प्रभावित झाले, ज्यामुळे त्यांना त्यांची स्टाेरी सांगण्यास भाग पाडले. अमिताभ रुचीला विचारतात की, “ती तिचे आडनाव का वापरत नाही.” यावर स्पर्धकने उत्तर दिले, “मला वाटते आडनाव तुम्हाला जातीच्या बंधनात टाकते. मला वाटते की, तुमचे पहिले नाव तुम्हाला ओळखण्यासाठी पुरेसे आहे. माझ्याप्रमाणे माझे पती देखील आडनाव वापरत नाहीत. लहानपणापासून मला फक्त रुची या नावाने ओळखले जाते आणि कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर मी फक्त रुची आहे.”

अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटाविषयी बाेलायचे झाले तर, त्यांचा हा चित्रपट 11 नाेव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. (bollywood actor amitabh bachchan reveals how he got the surname bachchan at he stage of kbc 14)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांकाने घेतला गावातील शाळेचा आढावा; म्हणाली, ‘बदलाची सुरुवात लहानपणापासून व्हायला हवी’

गुरु नानक जयंतीनिमित्त काजोल पोहोचली गुरुद्वारात, पाहा भन्नाट फाेटाे

हे देखील वाचा