Saturday, March 2, 2024

अरे वाह! अनुपम खेरने अमिताभ बच्चनची केली मालिश; बिग बी म्हणाले, ‘हाय अनुपम..’

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘कौन बनेगा करोडपती 14‘ च्या आगामी भागात अमिताभ बच्चन त्यांच्या ‘उंचाई‘ या चित्रपटातील सहकलाकारांसोबत खूप धमाल करणार आहेत. आगामी एपिसोडमध्ये शोचे होस्ट अमिताभ बच्चन तसेच अनुपम खेर, बोमन इराणी आणि नीना गुप्ता दिसणार आहेत. शोचा एक रंजक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये स्टार्स मस्ती करताना दिसत आहेत, त्यासाेबतच आगामी एपिसोड्समध्ये हे सर्व स्टार्स इमोशनल होताना देखील दिसणार आहेत.

अमिताभने घेतला मसाजचा आनंद
आगामी भागातून समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अनुपम खेर (Anupam Kher) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या खांद्यावर मालिश करताना दिसत आहेत तर बिग बी त्यांच्या मसाजचा आनंद घेत म्हणतात की, “हाय अनुपम.” हे ऐकून सगळे हसायला लागतात. हा प्रोमो शेअर करताना, सोनी टीव्हीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अमिताभ बच्चन जी त्यांच्या मित्रांना KBC च्या मंचावर भेटतील, आणि कळेल की, का झालेत सर्व भावूक” व्हिडिओमध्ये अनुपम खेर बिग बींच्या खांद्यावर मालिश करताना दिसत आहेत.

चाैघांनीही केली ट्रेडमार्क डान्स स्टेप
प्राेमाेच्या सुरुवातीला ‘उंचाई’ पोस्टरमध्ये दिसल्याप्रमाणे त्या चौघांनीही एक पाय समोर ठेवून त्यांची ट्रेडमार्क डान्स स्टेप केली आहे. ही पोज सूरज बडजात्याच्या 1999 मध्ये आलेल्या ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या पोस्टरसारखी दिसते. ते गेम खेळायला जात असताना, बोमन इराणी हॉट सीटवर बसतात आणि घोषणा करतात, “चला मजा घेऊया.” यानंतर शोदरम्यान अनुपम अमिताभ यांच्या खांद्याचा मसाज करत असतानाची एक झलक पाहायला मिळते. (bollywood amitabh bachchan having fun uunchai co stars anupam kher boman irani and neena gupta as well as getting emotional)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निम्रत कौर अहलुवालियाने प्रियंका चौधरीला केली शिवीगाळ? पाहा व्हायरल व्हिडिओ

शाेयबसाेबत लग्न बंधनात अडकण्यापूर्वी सानियाचा माेडला हाेता साखरपुडा, वाचा सविस्तर

हे देखील वाचा