Sunday, June 16, 2024

बिग बींना बेल बाॅटम घालने पडले महागात, एक उंदीर त्यांच्या पॅटंमध्ये घुसला अन्…

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे इंडस्ट्रीतील अशा स्टार्सपैकी एक आहेत जे अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. बिग बींच्या दिवसाची सुरुवात एका सोशल मीडिया पोस्टने होते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्याच्या आयुष्याशी निगडित अनेक नवीन – जुने किस्से ते सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यादरम्यान, आता अमिताभ बच्चन यांनी आणखी एक मजेशीर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे, ज्यामुळे त्यांची पाेस्ट माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बिग बींनी त्यांचा जुना फोटो शेअर केला आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये बिग बी फुल ऑन अॅक्शन मूडमध्ये बेल बॉटम पँट घातलेले दिसत आहेत. या फोटोतील त्याचा चेहरा पाहता हे लक्षात येते की, हा त्यांच्या एका अॅक्शन सीनचा फाेटाे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताब बच्चन यांच्या पॅंटमध्ये घुसला उंदीर
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या फाेटाेसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “दो और दो पांच.. किती मजा आली या चित्रपटामध्ये.. बेल बॉटम्स आणि सर्वांसह!!! … अहो बेल बॉटम ही त्या दिवसांमध्ये खूप खुणावणारी फॅशन होती.. मी थिएटरमध्ये चित्रपट बघायला गेलो होतो, तेव्हा एक उंदीर माझ्या पँटमध्ये शिरला.. बेल बॉटमसाठी धन्यवाद….”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

या फोटोवर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया सातत्याने येत आहेत. याआधीही बिग बींनी त्यांच्या चित्रपटांशी संबंधित अनेक मजेशीर किस्से शेअर केले आहेत.(bollywood actor amitabh bachchan reveals when a rat enter in his bell bottom pants in cinema hall)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आनंदाने आणि अभिमानाने प्रेम व्यक्त करत करण जोहरने लिहिली कियारा आणि सिद्धार्थला एक खास पोस्ट

नाना पाटेकर यांनी आतंकवाद्यची भूमिका आहे म्हणून बॉडी ऑफ लाइज हॉलीवूडपटाला दिला होता झटक्यात नकार

हे देखील वाचा