Saturday, July 27, 2024

नाना पाटेकर यांनी आतंकवाद्यची भूमिका आहे म्हणून बॉडी ऑफ लाइज हॉलीवूडपटाला दिला होता झटक्यात नकार

नाना पाटेकर मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील हिट ठरलेले दिग्गज अभिनेते. आपल्या प्रतिभेने आणि भारदस्त आवाजाने त्यांनी स्वतःची एक वेगळी छबी निर्माण केली. तुम्हाला माहित आहे का? मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाची चूक दाखवणाऱ्या नाना पाटेकर यांना हॉलिवूड सिनेमाची ऑफर आली होती. हॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता असलेल्या लियोनार्डो डिकैप्रियोचे चाहते संपूर्ण जगभर पसरले आहेत. इतर इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकार त्याच्यासोबत काम करण्यासाठी आतुर असतात. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. जेव्हा जेव्हा बॉलिवूड कलाकारांना अशी संधी येते तेव्हा ते कधीच ती जाऊ देत नाही. मात्र तुम्हाला माहित आहे का? नाना पाटेकर यांना देखील अशीच एक संधी मिळाली होती , मात्र त्यानी ती साफ नाकारली. याचा खुलासा दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकताच केला आहे.

एका मुलाखतीमध्ये अनुराग म्हणाला, “हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रिडले स्कॉट यांनी नाना पाटेकर यांना त्यांच्या ‘बॉडी ऑफ लाइज’ या सिनेमाची ऑफर दिली होती. मात्र नाना यांनी ती ऑफर नाकारली. ही ऑफर नाकारताना त्यांनी कारण सांगितले की, रिडले स्कॉट यांनी नाना पाटेकर यांना आतंकवाद्यची भूमिका ऑफर केली असल्यामुळे त्यांना ती नव्हती करायची आणि त्यानी ती भूमिका नाकारली.”

Leonardo Dicaprio
Photo Courtesy: Instagram/leonardodicaprio

पुढे अनुराग म्हणाला, “निर्माते क्रिस स्मिथ याला त्याच्या ‘द पूल’ या सिनेमासाठी नाना सारख्या अभिनेत्याची गरज होती. तेव्हा मी नाना यांच्याकडे गेलो. क्रिस स्मिथने मला एक फोटो दाखवला होता. तो पाहून मला देखील जाणवले की त्या भूमिकेसाठी नाना एकदम बरोबर आहे. त्यांनी देखील या भूमिकेला होकार दिला. या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले. सिनेमातील नानाचे काम पाहून रिडले स्कॉट प्रेरित झाले आणि त्यांनी मला एक मेल केला. त्यांनी सांगितले की त्यांना ‘बॉडी ऑफ लाइज’ सिनेमात मार्क स्ट्रांग या भूमिकेसाठी नाना यांना घेऊ इच्छिता. मी हे नाना ना सांगितले त्यावर ते म्हणाले, “आतंकवाद्याची भूमिका आहे, नाही करायची. सांगून दे.” हा सिनेमा २००८ सालातील मोठा सिनेमा होता.

पुढे अनुरागला विचारले गेले की, त्याने कधीच नाना पाटेकर यांच्यासोबत का काम केले नाही? त्यावर तो म्हणाला, “नानांसोबत नेहमीच या विषयावर चर्चा होते, मात्र काही जुळून येत नाही.” तत्पूर्वी नाना हे नेहमीच ग्लॅमर आणि लाइमलाईटपासून लांब राहतात. आपले काम करून ते बाजूला होतात. त्यांची हीच बाब सर्वाना आवडते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अजून किती वाट पाहायची! पुन्हा एकदा समंथाच्या ‘शाकुंतलम’ सिनेमाचे प्रदर्शन गेले पुढे

भोजपुरी अभिनेत्री असलेल्या माही श्रीवास्तवच्या ‘ननद अब हद कइली’ गाण्याने घातला धुमाकूळ

हे देखील वाचा