Friday, November 22, 2024
Home अन्य मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची तब्येत खालावली, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची तब्येत खालावली, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

सत्तरच्या आणि ऐँशीच्या दशकात आपल्या नैसर्गिक अभिनय कौशल्याने कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजेच अमोल पालेकर. अभिनेते अमोल पालेकर यांची तब्येत बुधवार (९ फेब्रुवारी) रोजी अचानक खालावल्याने त्यांना उपचारार्थ पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Actor Amol Palekar Hospitalised)

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Actor Amol Palekar) यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

बॉलिवूडसह इतरही चित्रपटसृष्टीत अमोल पालेकर (Bollywood Actor Amol Palekar) यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. धुम्रपान आणि इतर गोष्टींमुळे पालेकर यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त याअगोदरही समोर आले होते. त्यामुळे बुधवारी जेव्हा त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा ही बातमी सर्वत्र वेगाने पसरली. (Bollywood Actor Amol Palekar Hospitalised In Pune)

हेही वाचा – ‘आशिकी’ अभिनेता राहुल रॉयला एकाचवेळी ६० चित्रपटांची मिळाली होती ऑफर, संपत्ती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

त्यामुळेच ७७ वर्षीय अमोल पालेकर यांची तब्येत लवकरात लवकर सुधरावी आणि ते सामान्य आयुष्य जगावेत, यासाठी त्यांचे असंख्य चाहते प्रार्थना करत आहेत. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्या काळजीचे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे.

चित्रकलेची आवड असणारे अभिनेते अमोल पालेकर हे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पेशाने बँकर होते. बँक ऑफ इंडियात ते क्लर्क म्हणून कार्यरत होते. अपघातानेच ते अभिनय क्षेत्रात आले. मात्र, ७० आणि ८० च्या दशकात अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाची चुनूक दाखवत संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडली.

अमोल पालेकर यांनी रजनीगंधा, छोटी सी बात, नरम गरम, गोलमाल, चितचोर, भूमिका,रंग-बिरंगी, घरोंदा, सावन, बातों बातों में यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर, ‘बाजीरावचा बेटा’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे’  यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला. शाहरुख आणि राणी मुखर्जी यांची भुमिका असलेल्या ‘पहेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील अमोल पालेकर यांनी केलेले आहे. एक ताकदीचे आणि व्यासंगी अभिनेते म्हणून अभिनेते अमोल पालेकर यांची विशेष ओळख आहे. (Bollywood Actor Amol Palekar Hospitalised In Pune Dinanath Mangeshkar Rugnalay)

अधिक वाचा –

माणुसकीचे दुसरे नाव म्हणजे सोनू सूद! अपघातग्रस्ताला मदत करत पुन्हा एकदा समाजासमोर ठेवले उत्तम उदाहरण

‘माझे स्वप्न अपूर्ण राहिले’, लता दिदींबाबत बोलताना हा निर्माता झाला प्रचंड भावूक

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा