Monday, May 13, 2024

‘माझे स्वप्न अपूर्ण राहिले’, लता दीदींबद्दल बोलताना ‘हा’ चित्रपट निर्माता भावूक

संगित क्षेत्रात कोहिनूर हिरा म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते, त्या गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज 6 फेब्रुवारीला पहिली पुण्यतिथी आहे. आपल्या मधुर आवाजाने त्यांनी 35पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तर 1000 पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी आपल्या आवाजात गाणी गायली आहेत. चित्रपटक्षेत्रातील प्रत्येक दिग्दर्शक त्यांना आपल्या चित्रपटातील गाणे द्यायला उत्सुक असायचा. मात्र, चित्रपट निर्माते विवेक रंजन यांना त्यांच्या एका गाण्यासाठी लता दीदींना तयार केला होते त्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याने आता हे स्वप्न कधीच पुर्ण होणार नसल्याची खंत त्याने बोलून दाखवली.

चित्रपटनिर्माता विवेक रंजन अग्निहोत्रीने सांगितले की, ” मार्च 2020 मध्ये लता दीदींनी ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासाठी गाणे गाण्याचे मान्य केले होते. काश्मिर फाईल्स हा काश्मिरी जनतेच्या दुःखावर आधारित चित्रपट आहे. ज्यामध्ये एका लोकगीतासाठी लता मंगेशकर यांनी होकार दिला होता. त्यांनी आता गाणे गायचे बंद केले आहे परंतु मी खूप विनंती केल्याने आणि माझी पत्नी पल्लवी जोशी आणि लता दीदींचे जवळचे संबंध असल्याने त्या हे गाणे गाण्यासाठी तयार झाल्या होत्या. त्यांनी कोरोनाचा काळ संपला की हे गाणे गाण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्या पूर्वीच त्यांचे निधन झाल्याने माझे हे स्वप्नं कधीच पूर्ण होणार नाही”.

लता दीदींच्या आठवणी सांगताना तो म्हणाला की, “मी चित्रपट क्षेत्रात नवखा होतो तेव्हा माझ्या एका कार्यक्रमात लता दीदी आल्या होत्या. आजही अनेक कलाकार सेलेब्रिटी सारखे वागतात मात्र त्यावेळी लता दीदी अत्यंत नम्र आणि शांत वाटल्या. यशाच्या शिखरावर असूनही कसलाही बडेजाव त्यांनी केला नाही. त्या खूप प्रेमळ आणि प्रामाणिक आहेत”

त्यांना टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपट खूप आवडतात. कधीही एखाद्या कलाकाराने चित्रपटात चांगले काम केल्यास त्याचे कौतुक म्हणून त्या त्याला मिठाई पाठवत असत. त्यांचे या देशावर खूप प्रेम होते. अशा आठवणी ही यावेळी विवेकने बोलून दाखवल्या. लता मंगेशकर यांच्या अनेक आठवणी सध्या कलाकार बोलून दाखवत आहेत. प्रत्येकजण त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त करत आहे.(lata mangeshkar promise to sing a song for kashmir files)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जगातल्या 200 सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये लता दीदींचा समावेश, बहुमान मिळालेल्या दीदी ठरल्या एकमेव भारतीय

लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये 350 कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…

हे देखील वाचा