Thursday, April 18, 2024

अनुपम खेर यांचा पाेहण्याचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, पाेस्ट करत म्हणाले,’अडचणींपासून दूर पळणे…’

दिग्गज अभिनेता अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि दररोज त्यांच्या चाहत्यांसाेबत मनोरंजक पोस्ट शेअर करताना दिसतात. यासाेबतच अभिनेता अनेकदा त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना लाइफ टिप्स देखील देत असतात. अशातच अनुपम खेर यांनी स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते पोहताना दिसत आहेत. पोस्टसोबत त्यांनी एक अतिशय प्रेरणादायी कॅप्शन लिहिले आहे. काय म्हणाले अभिनेता? चला जाणून घेऊया…

अभिनेता अनुपम खेर (anupam kher) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते आपले पोहण्याचे कौशल्य दाखवताना दिसत आहे. यासोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अडचणींपासून दूर पळणे सोपे आहे. जीवनातील प्रत्येक पैलू ही परीक्षा आहे. जे घाबरतात त्यांना आयुष्यात काहीच मिळत नाही. लढणाऱ्यांच्या पायाशी जग आहे. यासोबत अभिनेत्याने लिहिले आहे की, ‘हिंमत दाखवा, भितीतून बाहेर पडा.’

याआधी म्हणजेच 7 मार्च राेजी अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर करून पोहणे शिकण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली होती. अनुपम खेर यांनी सांगितले होते की, ‘त्यांना पोहणे अजिबात येत नाही, पण त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत.’ यासोबतच त्यांनी असंही लिहिलं हाेते की, ‘येत्या वर्षभरात काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेरच्या नुकत्याच आलेल्या व्हिडिओवर युजर्स त्यांची खूप प्रशंसा करत आहेत. एका युजरने  कमेंट करत लिहिले की, ‘सर, तुम्हाला पाहून आम्ही आयुष्य जगायला शिकलो. अडचणींपासून पळून न जाता, त्यांचा सामना करायला शिकलाे.’ तर, दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘स्वतःला नेहमी प्रेरित कसे ठेवायचे, ते तुमच्याकडून खूप चांगले शिकता येते.’ अशात एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही एक अप्रतिम अभिनेता आणि माणूस आहात.'(bollywood actor anupam kher shares his swimming video with motivational caption says overcome fear )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली इशिता दत्ता, फाेटाे व्हायरल

अनुष्कापासून ते जान्हवीपर्यंत, तुमच्या आवडत्या अभिनेत्रींना दहावीत हाेते ‘इतके’ टक्के

हे देखील वाचा