Saturday, June 29, 2024

मलायकाचे अर्जुन कपूरसाेबत अफेअर असतानाही अरबाज का भेटताे अभिनेत्रीला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेता ‘द इन्व्हिन्सिबल्स विथ अरबाज खान’ या चॅट शोमुळे चर्चेत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर युजर्स अरबाजला त्याच्या आणि मलायकाच्या नात्यावर अनेक प्रश्न विचारत आहे. या दोघांचे त्यांच्या मुलासोबतचे व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. अशात आता अरबाजने त्याच्या आणि मलायकाच्या नात्याचा खुलासा केला आहे आणि सांगितले आहे की, ‘कोणत्या कारणामुळे दोघांना एकत्र यावे लागले.’

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजने मलायकासोबतच्या नात्याबद्दल मौन सोडले आणि म्हणाला, “मलायका आणि मी आमचे मतभेद बाजूला ठेऊन पुढे गेले आहाेत. आता आमच्यात राग किंवा निराशा असे काहीही नाही. आम्ही जरी एकत्र आलो आहाेत, तर ते केवळ आमच्या मुलामुळेच. कारण, आम्ही त्याला या जगात आणले आहे, त्यामुळे त्याला चांगले आयुष्य देणे आणि त्याची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे.”

अरबाज पुढे म्हणाला, “आम्हाला पाहून लोक याला ‘ड्रामा’ म्हणतात. मात्र, मी या लाेकांना फारसे महत्व देणे गरजेचे समजत नाही. हे लोक आम्हाला कॅमेरात पाहून पारखतात. मात्र, हे लोक येऊन आमची अवस्था बघत नाहीत. आम्ही आमचा मुलगा अरहानचा वाढदिवस एकत्र साजरा करतो. माझ्या मुलाच्या कामाबद्दल, त्याच्या करिअरबद्दल किंवा त्याच्या जबाबदाऱ्या आणि गरजांबद्दल मी मलायकाशी सतत बोलत असताे.”

अरबाजने मलायकाबद्दल असेही म्हटले आहे की, “मलायका आणि मी दोघेही मीडियामध्ये चर्चेत राहताे. कारण, हे सर्व आम्ही आमच्या मुलासाठी करत असताे. मलायका आणि मी वेगळे झालो आहोत हे नाकारता येणार नाही, पण आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो, अशात आम्ही फक्त आमच्या मुलासाठी एकत्र आहोत.” असे अरबाजचे म्हणणे आहे.

अरबाज सध्या त्याच्या चॅट शो द इन्व्हिन्सिबल्स विथ अरबाज खान’साठी लोकप्रियता मिळवत आहे.(bollywood actor arbaaz khan talks about his relation with malaika arora and says we are together for our son arhaan khan )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
रिंकूने सादर केला साऊथ लूक, लखलखणाऱ्या फोटोंचा इंटरनेटवर धुराळा
पडद्याआड सारासाेबत राेमॅंटीक झाली शेहनाज; अभिनेत्री म्हणाली, ‘माझी सर्व लिपस्टिक संपली…’

हे देखील वाचा