Saturday, June 29, 2024

अय्याे! अर्जुन कपूरने चक्क व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीला म्हटलं, ‘झुटी और मक्कार’

बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिंदी सिनेसृष्टीत खूप लोकप्रिय आहे. तिची पडद्यावरची दमदार उपस्थिती आणि जबरदस्त अभिनयामुळे ती अनेकांना आवडते. श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात नुकताच तिचा मित्र अर्जुन कपूरने एक नवीन व्हिडिओ शेअर करून श्रद्धाची खिल्ली उडवली आहे.

अर्जुन कपूरने शेअर केला लेटेस्ट व्हिडिओ
अर्जुन कपूर (arjun kapoor) याने अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर गाणे गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, अर्जुनने हा व्हिडिओ श्रद्धा कपूर (shraddha kapoor) हिला नाही तर दुसऱ्या कुणाला डेडिकेट केला आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, ‘इतक्या वर्षांनंतर मला कळले की, माझी ओजी म्हणजेच हाफ गर्लफ्रेंड श्रद्धा कपूर ‘झूठी और मक्कार है’. म्हणून तुझ्या प्रेमात मी माझे पहिले प्रेम, माझे केस समर्पित करतो. अर्जुन आणि श्रद्धाने 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाफ गर्लफ्रेंड’मध्ये एकत्र काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटाद्वारे श्रद्धा कपूर करणार पुनरागमन
‘तू झुठी मैं मक्कर’च्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच अनोख्या पद्धतीने चित्रपटाच्या टाइटलची घोषणा केली होती. रणबीर कपूर आणि श्रद्धा पहिल्यांदाच या चित्रपटाद्वरे एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांची जोडी चित्रपटात रोमान्स करताना पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

‘तू झुठी मैं मक्कर’ पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर श्रद्धा कपूर या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. (bollywood actor arjun kapoor calls shraddha jhoothi aur makkaar dedicates a song for his first love)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत माेठी अपडेट; आता अशी आहे तब्येत, जाणून घ्या…

रितेश-जिनेलियाच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, आठवणींना उजाळा देत शेअर केला लग्नाचा व्हिडिओ

हे देखील वाचा