Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘मुली लवकर मोठ्या होतात’, म्हणत अर्जुन रामपालने शेअर केले मुलींसोबतचे थ्रोबॅक फोटो

‘मुली लवकर मोठ्या होतात’, म्हणत अर्जुन रामपालने शेअर केले मुलींसोबतचे थ्रोबॅक फोटो

टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमध्ये काम करून अभिनेता अर्जुन रामपाल याने प्रेक्षकांच्या मनात त्याची अढळ जागा निर्माण केली आहे. नायकापासून ते खलनायकापर्यंत त्याने अनेक भूमिका निभावल्या आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी त्याच्या प्रत्येक भूमिकेला नावाजले. अर्जुन हा चित्रपटसृष्टीत जेवढा चांगला कलाकार आहे. तेवढाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो एक चांगला पती आणि वडील आहे. सोशल मीडियावर अनेकवेळा अर्जुन त्याच्या मुलांसोबत फोटो शेअर करत असतो. अशातच त्याचे त्याच्या मुलांसोबत काही फोटो व्हायरल होत आहेत.

फिल्मफेअरच्या ट्विटर अकाऊंटवरून अर्जुन आणि त्याच्या मुलींचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, दोन फोटोंमध्ये अर्जुनच्या मुली लहान दिसत आहे. तो त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसत असून, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्या मुली मोठ्या दिसत आहे. ते कुठे तरी व्हॅकेशनला गेलेले असून, त्याच्या मुली स्विमिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. तर अर्जुन देखील शर्टलेस दिसत आहे. त्यांचा हा फोटो कोणत्या तरी बीचवरील आहे. (Bollywood actor arjun rampal’s photo with his children viral on social media)

अनेकजण या फोटोवर कमेंट करून त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. अर्जुनला दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्याच्या मुलींची नावे, महिका रामपाल आणि मायरा रामपाल आहेत. तर मुलाचे नाव अरिक रामपाल हे आहे. मुलांसोबत घालवलेले हे खास क्षण त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.

अर्जुन रामपालच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ‘ओम शांती ओम’, ‘दिल है तुम्हारा’, ‘डॅडी’, ‘रावण’, ‘रॉय’, ‘हमको तुमसे प्यार है’, ‘हाऊसफुल’, ‘ऑंखे’, ‘डॉन’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तो लवकरच ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी अर्जुनला एनसीबीने अं’मली पदार्थ प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हा तो खूप चर्चेत आला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा