Sunday, February 1, 2026
Home बॉलीवूड दिग्गज अभिनेता हरपला! ‘द गाझी अटॅक’ फेम बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

दिग्गज अभिनेता हरपला! ‘द गाझी अटॅक’ फेम बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. मागील काही महिन्यांमध्ये या व्हायरसमुळे अनेक कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता बॉलिवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे ते निवृत्त सैनिक होते. त्यांनी सन २००३ मध्ये ‘पाप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

त्यांच्या निधनाची बातमी चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विटरवरून दिली. अशोक लिहितात, “सकाळी कोरोना व्हायरसमुळे बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले. एक निवृत्त सैनिक, कंवरपाल यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि जवळच्या नातवाईकासांठी माझ्या संवेदना.”

बिक्रमजीत यांनी अनेक मालिकेत काम केले आहे. त्यात ‘स्पेशल ओप्स’, ‘इलिगल- जस्टिस, आऊट ऑफ ऑर्डर’, ‘अनदेखी’ आणि ‘आपके कमरें में कोई रेहता है’ यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांंमध्येही आपल्या अभिनयाचा जादू दाखवला आहे. त्यात ‘साहो’, ‘द गाझी अटॅक’, ‘रॉकेट सिंग: द सेल्समन ऑफ द इअर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्येे त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, ते त्यांच्या कुटुंंबाची खूप आठवण काढत आहेत. त्यांना पुन्हा एकदा एकत्र यायचे आहे. तसेच त्यांनी सर्वांना घरातच राहण्याचे आवाहनही केले होते.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये बॉलिवूड आणि टीव्हीमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये अभिनेता आमिर खान, आर माधवन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कार्तिक आर्यन आणि इतर बरेच कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-

 

-कोरोनाने घेतला महान व्यक्तीचा बळी! नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन, तापसी पन्नूने व्यक्त केला शोक

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

-‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक

हे देखील वाचा