Thursday, April 10, 2025
Home नक्की वाचा फरहान अख्तरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, पाेस्ट शेअर करत म्हणाला…

फरहान अख्तरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, पाेस्ट शेअर करत म्हणाला…

बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता, लेखक आणि गायक फरहान अख्तर अलीकडेच त्याची पत्नी शिबानी दांडेकरसोबतच्या पहिल्या एनिवर्सरीमुळे चर्चेत होता. अभिनेत्याने त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर करून शिबानीवरील प्रेम व्यक्त केले. अशात फरहानने एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. आपल्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांना उद्देशून अभिनेत्याने ही पोस्ट टाकली आहे. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…

फरहान अख्तर (farhan akhtar) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर आगामी ऑस्ट्रेलियन टूरबाबत एक घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये फरहान अख्तरने या महिन्यात हाेणारा त्याच्या बँडचा ऑस्ट्रेलिया टूर रद्द झाल्याची माहिती दिली. अभिनेता म्हणाला, “काही अनपेक्षित परिस्थितीमुळे हा महिना रद्द करण्यात आला आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

फरहान अख्तरने इंस्टाग्रामवर लिहिले की, “ऑस्ट्रेलियातील माझ्या चाहत्यांना ही माहिती आहे, अनपेक्षित परिस्थितीमुळे आमचा बँड फरहान लाईव्हला त्यांचा ऑस्ट्रेलिया टूर रद्द करावा लागला आहे. येत्या वीकेंडला आम्ही सिडनी आणि मेलबर्नला येऊ शकणार नाही. या गोष्टीमुळे मी खरोखर निराश झालो आहे. मात्र, तरीदेखील मी लवकरच तुमच्या सुंदर देशात येण्यासाठी आणि तुमच्यासाठी लाइव्ह परफॉर्म करण्यासाठी उत्सुक आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

फरहानची ही पाेस्ट समाेर येताच चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “मी तुला भेटण्यासाठी बेताब होतो.”, तर दुसरा म्हणाला, “हा शो का रद्द केला? आमच्या सगळ्या उत्सुकतेवर पाणी फिरलं.”

फरहान अख्तरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर फरहान ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत, ज्या पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.(bollywood actor farhan akhtar cancels concert in sydney due to unforeseen circumstances shares note for fans on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

अखेर हनी सिंगने बादशाहसाेबतच्या वादावर साेडले माैन; म्हणाला,”आम्ही कधीच मित्र…”

हे देखील वाचा