बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि गायक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी लग्नगाठ बांधली आहे. ज्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर रिंग सेरेमनी करून दोघांनी लग्नाचे विधी पूर्ण केले. यादरम्यान दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र या सोहळ्याला उपस्थित होते. अभिनेता फरहान अख्तरचे हे दुसरे लग्न आहे. या अभिनेत्याने १९९८ मध्ये हेअरस्टायलिस्ट अधुना भाबानीशी लग्न केले. पण १६ वर्षांनंतर दोघांचे नाते संपुष्टात आले. यानंतर शिबानीला ५ वर्षे डेट केल्यानंतर फरहानने तिच्याशी लग्न केले. मात्र, पुन्हा लग्न करून सेटल होणारा फरहान हा इंडस्ट्रीतील पहिला कलाकार नाही. इंडस्ट्रीत याआधीही अनेक कलाकारांनी पहिले लग्न मोडल्यानंतर दुसऱ्या लग्न करून आपला संसार थाटला आहे. चला जाणून घेऊया अशाच काही कलाकारांबद्दल.
पंकज कपूर
बॉलिवूड अभिनेता पंकज कपूर यांनी १९७९ मध्ये नीलिमा अझीमसोबत लग्न केले. त्यांचे लग्न केवळ ५ वर्षे टिकले. नीलिमा आणि पंकज यांना शाहिद कपूर हा मुलगा आहे. नीलिमापासून घटस्फोट घेतल्यानंतर पंकज यांनी १९८८ मध्ये सुप्रिया पाठकसोबत लग्न केले.
जावेद अख्तर
फरहान अख्तरच्या आधी त्याचे वडील जावेद अख्तर हेही दुसरे लग्न केले आहे. जावेद यांचे आधी हनी इराणीशी लग्न झाले होते. पण नंतर ते शबाना आझमीच्या प्रेमात पडले. अशा परिस्थितीत १९८४ मध्ये शबाना आझमी यांच्याशी लग्न केल्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी हनीला घटस्फोट दिला.
मिथुन चक्रवर्ती
बॉलिवूडचा डिस्को डान्सर अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनीही दुसऱ्या लग्नानंतर जोडीदाराची निवड केली. १९७९ मध्ये अभिनेत्याने हेलेना ल्यूकशी लग्न केले. पण ते लग्नही त्याचवर्षी मोडले. यानंतर १९७९ मध्ये मिथुन यांनी योगिता बालीसोबत लग्न केले. योगिता बाली यांचे देखील हे दुसरे लग्न होते. मिथुन यांच्या आधी तिने किशोर कुमारशी लग्न केले.
सैफ अली खान
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने १९९१ मध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठी असलेली अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले. या लग्नापासून दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुले आहेत. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी दोघेही २००४ मध्ये वेगळे झाले. यानंतर सैफ अली खानने २०१२ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानसोबत दुसरे लग्न केले. सैफ अली खानला दुस-या लग्नापासून तैमूर आणि जहांगीर हे दोन मुले आहेत.
करण सिंग ग्रोव्हर
प्रसिद्ध अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने २००२ मध्ये श्रद्धा निगमसोबत लग्न केले. पण १० महिन्यांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर २०१२ मध्ये त्याने अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत लग्न केले. पण त्यांचे हे लग्नही २ वर्षातच तुटले. यानंतर करणने बॉलिवूडमध्ये प्रवेश करताच अभिनेत्री बिपाशा बसूसोबत २०१६ मध्ये तिसरे लग्न केले.
दिया मिर्झा
गेल्यावर्षी १५ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री दिया मिर्झाचे हे दुसरे लग्न होते. दियाने २०१४ मध्ये बिझनेस पार्टनर साहिल संघासोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या ५ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर अभिनेत्रीने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली.
हेही वाचा-
- The Kashmir Files | अखेर बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, कश्मिरी पंडितांच्या वेदनादायक कथा टाकणार हादरवून
- Shaakuntalam | समंथाच्या चित्रपटाचा पोस्टर रिलीझ; सौंदर्य असे, ‘परमसुंदरी’च जणू!
- काजल अग्रवालचे झाले थाटात डोहाळजेवण पार, सोशल मीडियावर झाले फोटो व्हायरल