Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

सबाच्या ‘या’ गाेष्टीवर आले ऋतिकचे मन! ट्विटरवरून सुरू झाली लव्हस्टोरी, अशी आहे संपूर्ण कहाणी

बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच लाइम लाइटमध्ये होता. 2000 मध्ये आलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून ऋतिकने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. ऋतिक सध्या त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच ऋतिकने त्याची गर्लफ्रेंड सबासोबत सुनैना रोशनच्या वाढदिवसाला हजेरी लावली. ऋतिक आणि सबाच्या नात्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. दोघांना अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे.

एवढेच नाही तर ऋतिक (hrithik roshan) आणि सबा (saba azad) हिच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत आहेत, पण तुम्हाला माहित आहे का? की, या दोघांची प्रेमकहाणी ट्विटरवरून सुरू झाली होती. माध्यमातील वृत्तानुसार, ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची मैत्री ट्विटरवर झाली. ऋतिक रोशनला एक व्हिडिओ आवडला हाेता, जाे त्याने ट्विटरवर शेअर केला हाेता.

माध्यमातील वृत्तानुसार, दोघांमध्ये गेल्या वर्षी ट्विटरवर संवाद सुरू झाला. यानंतर दोघांची मैत्री झाली. 20 फेब्रुवारी 2021 दरम्यान दोघांच्या डेटिंगच्या बातम्या समोर येऊ लागल्या. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसेल. यासोबतच दाेघेही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करु लागले.

सबा आझाद आणि ऋतिक रोशनने अनेकदा एकत्र डिनर केले आहे. ज्याचे फोटोही त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशन हिचा आज म्हणजेच 22 जानेवारीला वाढदिवस आहे. यानिमित्त साबा आझादही पार्टीत सहभागी झाली हाेती. त्यांचे फोटो ऋतिकची आई पिंकी रोशनने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ऋतिकचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. यासोबत सबा आझादही ऋतिकच्या शेजारी उभी आहे.

यापूर्वी ऋतिक रोशनने 2000 मध्ये सुझान खानसोबत लग्न केले होते. दोघांनाही २ मुलं आहेत. मात्र, त्यांचे वैवाहिक जीवन अवघ्या 13 वर्षांतच तुटले. 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, घटस्फोटानंतर दोघेही अनेकदा मुलांसोबत सुट्टी साजरी करताना दिसले आहेत. दोघेही एकमेकांचे मित्र आहेत.(bollywood actor hrithik roshan and saba azad love story started over twitter video and started chatting after divorce with sussanne khan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जबरा फॅन! ‘पठाण’ चित्रपटाचं तिकिट मिळत नसल्याने चाहत्यांने थेट शाहरुख खानकडेच घेतली धाव म्हणाला…

पांढऱ्या रंगाची साडी नेसून जान्हवी उतरली पाण्यात, फाेटाे बघताच युजर्सला आठवली ‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी

हे देखील वाचा