Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड ‘प्रेमाला वयाची मर्यादा नसेत..’, भर पार्टीत ऋतिक रोशनने धरली साबा आझादची चप्पल, फाेटाे व्हायरल

‘प्रेमाला वयाची मर्यादा नसेत..’, भर पार्टीत ऋतिक रोशनने धरली साबा आझादची चप्पल, फाेटाे व्हायरल

प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची प्रेमकथा बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये प्रसिद्ध झाली आहे. अलीकडेच ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या ग्रॅंड ओपनिंगमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. अशात या जोडप्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये ऋतिक रोशनचा एक नवा फोटो समोर आला आहे, जो पाहून चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत.

तर झाले असे की, ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या ग्रॅंड ओपनिंगमध्ये अनेक दिग्गज कलाकार पाेहचले हाेते. यामध्ये ऋतिक रोशन (hrithik roshan) आणि सबा आझाद (saba azad) यांचा देखली समावेश हाेता. अशात पार्टीमधला एक फाेटाे व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ऋतिक एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहे. यावेळी तुम्ही ऋतिकचा हात पाहिला तर तुम्हाला त्याच्या हातात प्रेयसी सबाची सॅंडल हात पकडली दिसेल.

अशात आता या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘किती क्यूट’, तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘प्रेमाला वयाची मर्यादा नसते.’ अशात एका युजरने लिहिले की, ‘वेडं असाव तर असं. मलाही तेच हवे आहे.’ यासोबत अनेक युजर्सनी ऋतिक आणि सबाच्या जाेडीला ‘क्यूट’ म्हंटले आहे.

Hrithik Roshan

सबा 37 वर्षांची आहे, तर ऋतिक 49 वर्षांचा आहे. दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर असले तरी दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या एक वर्षापासून हे जोडपे पब्लिकली अपीयरेंस देत आहे. मात्र, दोघेही त्यांच्या नातेसंबंधाच्या स्थितीबद्दल अजूनपर्यंत माैन बाळगूण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ऋतिक रोशनच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता शेवटचा ‘विक्रम वेध’ याचित्रपटामध्ये दिसला हाेता. अशातच हा अभिनेता दीपिका पदुकोणसोबत ‘फाइटर’ चित्रपटात दिसणार आहे, तर सबा नुकतीच ‘रॉकेट बॉईज सीझन 2’ मध्ये दिसली आहे. या मालिकेत सबा पुन्हा एकदा वकील परवाना इराणीच्या भूमिकेत दिसली आहे.(bollywood actor hrithik roshan holding girlfriend saba azad sandals in ambani party)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मग जा पाकिस्तानला’ म्हणत अभिनेत्री स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्विटला नेटकऱ्यांचे सणसणीत उत्तर

राम चरण अन् व्यंकटेशसोबत सलमान नाचला लुंगी डान्सवर; चाहते म्हणाले,’साँग ऑफ द इयर’

हे देखील वाचा