Monday, June 17, 2024

‘नापतोल व्हर्जन ऑफ कंगना’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड असणाऱ्या सबा आझादला ट्रोल

बॉलिवूडमधील हँडसम हंक असणारा ऋतिक रोशन हा नेहमीच त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या रिलेशनशिपच्या बातमीमुळे प्रकाशझोतात येत असतो. ऋतिक आणि अभिनेत्री सबा आजाद हे मागील काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांनी त्यांचे नाते जरी स्वीकारले नसले तरी नाकारले देखील नाहीये. त्यांना अनेकदा विविध ठिकाणी स्पॉट केले जाते. नुकतेच त्यांना एका कार्यक्रमाच्या ठिकाणी पुन्हा एकदा मीडियाने घेरले. सध्या त्यांचे या कार्यक्रमातील विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नुकतेच ऋतिक आणि सबाने वेब सीरिज ‘रॉकेट बॉईज २’ च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. या या सीरिजमध्ये सबादेखील भूमिका साकारत आहे. याच स्क्रीनिंमधील ऋतिक आणि सबाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एवढेच नाही काही लोकांनी तर सबा आणि कंगनाची तुलना केली तर काहींनी सबाला कंगनाची ‘स्वस्त कॉपी’ देखील म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ऋतिक आणि सबा मागील बऱ्याच काळापासून डेट करत असून ऋतिक नेहमीच सबाला पाठिंबा देताना दिसतो. आता सुद्धा तो सबाच्या ‘रॉकेट बॉय सीजन २’च्या स्क्रीनिंगला हजर राहिला. त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अतिशय विचित्र कमेंट्स केल्या आहेत. सबाच्या लूकवरून देखील तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. ‘हिला पाहून कंगना आठवते’, ‘हिच्यापेक्षा कंगना छान होती’, ‘ही कंगनाची स्वस्त कॉपी आहे’, ‘कंगना २.०’, ‘नापतोल व्हर्जन ऑफ कंगना’, ‘पाल’, ‘दुसऱ्या ग्रहावरण आल्यासारखी दिसते’ आदी अनेक प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. या कार्यक्रमाला ऋतिक नेहमी सारखा हँडसम दिसत होता. त्याने ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक ट्राउझरसोबत नारंगी रंगाचा चश्मा घातला होता. तर सबाने लाल लिपस्टिक, कुरळे केस, पांढरा फ्रॉक घातला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढांनी सांगितलं सीरियल सोडण्यामागील खरं कारण, म्हणाले…
काम मिळवण्यासाठी ‘गंगुबाई काठियावाडी’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा 40 वर्षे संघर्ष, सावळा रंग ठरले कारण

हे देखील वाचा