Friday, January 3, 2025
Home बॉलीवूड ऋतिक रोशनने त्याच्या डान्स स्टाईलबद्दल केला माेठा खुलासा, सांगितली ‘ही’ गाेष्ट

ऋतिक रोशनने त्याच्या डान्स स्टाईलबद्दल केला माेठा खुलासा, सांगितली ‘ही’ गाेष्ट

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन अभिनयासोबतच नृत्यासाठीही ओळखला जातो. ऋतिक प्रत्येक नृत्यशैलीमध्ये निपुण आहे. ऋतिकच्या डान्स स्टाइल आणि स्टेप्स पाहून प्रेक्षक वेडे होतात. अशात आता अभिनेत्याने त्याच्या डांसिंग स्टाइलबद्दल सांगितले आणि पार्टनर डांस स्टाइल शिकण्याची इच्छा व्यक्त केली. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेउया…

डान्सबद्दल बोलताना ऋतिक रोशन (hrithik roshan) म्हणाला की, “जेव्हा मी एकटा डान्स करतो तेव्हा मला आराम वाटतो, छान वाटतं, पण जेव्हा पार्टनर वर्क असतं तेव्हा त्यात तालमेलची गरज असते. मात्र, हे कौशल्य मी कधीच मिळवू शकलो नाही. मला ते शिकायचे आहे. मी बॅलेपासून खूप प्रभावित आहे.”

चित्रपटांमधील त्याच्या डान्स स्टेपबद्दल बोलताना, ऋतिक ने खुलासा केला की, “‘गुजारिश’मध्ये डांस फॉर्मसाठी ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली आणि ताे एक माझ्यासाठी अविश्वसनीय अनुभव होता. टेक दरम्यान, मला तीन टर्न घेता आले नाहीत. त्यानंतर आम्ही पुन्हा प्रयत्न केला, नंतर ते एकाच वेळी केले गेले. माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील सिग्नेचर डान्स स्टेप्समध्ये ‘बँग बँग टायटल ट्रॅक’, ‘वॉर’मधील ‘घुंगरू’ आणि ‘कोई मिल गया’मधील ‘इट्स मॅजिक’ यांचा समावेश आहे”, असे ऋतिक ने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

त्याच्या कामाविषयी बोलताना, ऋतिक रोशनने खुलासा केला की, ‘तो चित्रपटांमधील डांस सॉन्गसाठी रिहर्सल करण्यासाठी वेळ काढतो. गाण्याच्या रिहर्सलसाठी तो अनेकदा एक ते दोन महिने मागतो. ‘मैं ऐसा हूं’मध्ये प्रभूदेवाने त्याला एक महिन्याची वेळ दिल्याचा खुलासा अभिनेत्याने केला. अशाच एका चित्रपटादरम्यान संजय लीला भन्साळी यांनी त्याला दोन महिन्यांचा वेळ दिला होता.’ अभिनेत्याने सांगितले की, “जर तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला फक्त कठोर परिश्रम करण्याची गरज आहे आणि तुम्ही ते घडवून आणाल.”

ऋतिक रोशनने त्याच्या अभिनय काराकिर्दीत ‘वॉर’  ‘बँग बँग’, ‘कोई मिल गया’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मैं प्रेम की दिवानी हू’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.(bollywood actor hrithik roshan talks about his dancing style said i have been terrible at partner work )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अधुरी प्रेम कहाणी! या व्यक्तीमुळे आला ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यात दुरावा

फटाकडीच दिसते राव! अमृताने शेअर केले ऑफ शाेल्डर ड्रेसमध्ये फाेटाेशूट, एकदा पाहाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा