संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रकोप आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी आलेल्या या व्हायरसने पहिल्या लाटेतच अनेकांना रस्त्यावर आणले होते. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे खूप हाल झाले. असेच काहीसे आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. चित्रपटसृष्टीलाही याचा फटका बसला आहे. अनेक कलाकारांनी जीव गमावला आहे, तर काही कलाकारांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता ईशानची सावत्र आई आणि अभिनेत्री वंदना सजनानीनेही खुलासा केला आहे की, त्यांच्याकडील बचत संपली आहे. तसेच ते संकटात आहेत. वंदनाने सांगितले की, ते आणि तिचे पती राजेश खट्टर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. कारण त्यांची सर्व बचत रुग्णालयात खर्च झाली आहे.
वंदना सजनानीने राजेश खट्टरसोबत लग्न केले आहे, जे ईशान खट्टरचे वडील आणि सुपरस्टार शाहिद कपूरचे सावत्र वडील आहेत. नुकतेच वंदनाने एका न्यूज वेबसाईटशी बोलताना आपल्या समस्यांचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, मागील एक वर्षापासून आतापर्यंत त्यांच्यावर खूप वाईट वेळ आली आहे. वंदनाने म्हटले की, रुग्णालयाच्या फेऱ्या मारत त्यांच्या आर्थिक स्थिती खराब झाली आहे.
यापूर्वीही राजेश खट्टर यांनी म्हटले होते की, त्यांच्या घरातील सदस्यांसाठी रुग्णालयात बेड मिळवणे कोणत्याही वाईट स्वप्नासारखे होते. आता त्यांची पत्नी वंदनाने सांगितले की, त्यांच्याकडे काम नव्हते आणि रुग्णालयात जाण्यामुळे, त्यांना आपली बचत वापरावी लागली.
वंदनाने म्हटले की, “मागील वेळी मी रुग्णालयात होते. मला खरंच नव्हते माहिती की, बाहेर काय होत होते. मागील वर्षी मेमध्ये मला पोस्टमार्टम डिप्रेशन झाले होते. त्यावेळी लॉकडाऊन लागले होते. तेव्हापासून आतापर्यंत कोणी ना कोणी रुग्णालयात दाखल होत आहे. एक कलाकार म्हणून आम्ही खूप बचत करत आहोत. मागील वर्षी केवळ रुग्णालयात दाखल झाल्यामुळे आमचे खूप सारे रुपये खर्च झाले. काम बिल्कुल झाले नाही आणि बचत होती, तीदेखील रुग्णालयात भर्ती झाल्यामुळे दोन वर्षांच्या लॉकडाऊनमध्ये संपली.”
खरं तर मागील महिन्यात राजेश खट्टर आणि त्यांचे वडील दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर राजेश खट्टर ठीक झाले, परंतु त्यांच्या वडिलांना वाचवण्यात अपयश आले. यावर वंदनाने म्हटले की, “यामुळे आम्हाला खूप मोठा धक्का लागला आहे आणि आम्ही खूप दु:ख सहन केले आहे.”
वंदनापूर्वी राजेश खट्टर यांनी नीलिमा अजीम यांच्याशी लग्न केले होते. या दोघांचा मुलगा असलेल्या ईशान खट्टरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कपूर बहिणींनी शेअर केला आजी- आजोबांचा फोटो; पाहून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’
-‘भाभी जी घर पर है’मधील नवीन ‘गोरी मेम’ सोडतेय मालिका? नेहा पेंडसेने सांगितले सत्य
-गुणी मुलगी! आपल्या वडिलांची ‘ही’ इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीति झिंटाने खरेदी केली होती आयपीएल टीम