Thursday, June 13, 2024

‘या’ अभिनेत्याने 144 चित्रपटांमध्ये साकारली पोलिसांची भूमिका, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्येही नोंदवण्यात आलंय नाव

चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत, जे विशिष्ट व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जातात. काही म्हाताऱ्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातात, तर काही खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्याच वेळी, आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये बहुतेक चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका साकारली आणि त्याचसाठी ते प्रसिद्ध झाले.

१४४ चित्रपटात बनले पोलीस
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, ते दुसरे कोणी नसून जगदीश राज (Jagdish Raj) आहेत. तसे, त्यांनी १९५६ मध्येच त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. १९५६ च्या ‘सीआयडी’ चित्रपटात ते पहिल्यांदा पोलिस म्हणून दिसले होते. या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि बहुतांश चित्रपटांमध्ये ते पोलिसाच्या भूमिकेतच दिसले. जगदीश राज यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यांनी जवळपास १४४ चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका साकारली आहे. (bollywood actor jagdish raj who played police role in 144 films)

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
जगदीश राज यांनी चित्रपटांमध्ये १४४ वेळा पोलिसांची भूमिका साकारल्यामुळे, ‘मोस्ट टिपिकल कास्ट ऍक्टर’ म्हणून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

२०१३ साली घेतला जगाचा निरोप
जगदीश राज यांनी आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले होते आणि पोलिसांची भूमिका साकारून ते प्रसिद्ध झाले होते. मात्र, २८ जुलै २०१३ रोजी त्यांचे निधन झाले आणि या जगाचा निरोप घेऊन ९ वर्षे झाली.

मात्र, जगदीश राजप्रमाणेच त्यांची मुलगी देखील एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे जिचे नाव अनिता राज आहे. त्यांनी ८० आणि ९० च्या दशकातील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्य दाखवले आहे.

 

हे देखील वाचा