Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

शाहरुख खानच्या चाहत्यांना मोठा झटका, सिनेमागृहात ‘पठाण’ रिलीज होणारच नाही?

शाहरुख खानचा माेस्ट अवेटेड ‘पठाण’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चित्रपटातील गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर जाेरदार वाद रंगला आहे. चित्रपटाचे दुसरे गाणेसुद्धा नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यावरही लोकांनी प्रचंड टीका केली आहे. अशातच आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार असल्याची बातमी समाेर आली आहे.

‘पठाण’ (pathaan) चित्रपटाची शाहरुखचे चाहते अत्यंत आतुरतेने वाट पहात आहेत. काहीच दिवस प्रदर्शनासाठी राहिलेले असतानाही या चित्रपटाचा ट्रेलर न आल्याने सगळेच संभ्रमात पडले आहेत. तसेच सेन्सॉर बोर्डानेही पठाण चित्रपटात काही बदल सुचवल्याने हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशातच आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार असल्याची चर्चा साेशल मीडियावर जाेरदार सुरु आहे.

प्रसिद्ध अभिनेता कमाल रशीद खान (KRK) याने शाहरुखच्या ‘पठाण’बद्दल मोठा खुलासा केला आहे. केआरकेने ‘पठाण’ चित्रपट पोस्टपोन होणार असल्याची बातमी ट्विटद्वारे दिली आहे. ट्वीट करत केआरके म्हणाला, “पठाण चित्रपटाचे नाव बदलण्यात येणार आहे, भगव्या रंगाची बिकिनीसुद्धा बदलली जाणार आहे. यासाेबतच निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णयही घेतला आहे. याविषयी अधिकृत घोषणा आज किंवा उद्या होणार आहे.” असे केआरकेने आपल्या ट्विटद्वारे सांगितले.

याआधीच्या ट्वीटमध्येसुद्धा कमाल रशीद खानने शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा यांना टॅग करत ‘पठाण’बद्दल अशीच भविष्यवाणी केली होती. आता या लेटेस्ट ट्वीटमुळे केआरकेला पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. ‘पठाण’चा ट्रेलर आत्तापर्यंत प्रदर्शित व्हायला हवा होता, त्याविषयी अजूनही कोणती अधिकृत घोषणा न झाल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाभोवती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (bollywood actor kamaal rashid khan made shocking statement about shahrukh khan pathaan release)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर सुबोध भावेची ‘फुलराणी’ फुलणार, पोस्टर शेअर करत जाहीर केली नव्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख

‘मी माझा वेळ ‘या’ क्युटीसोबत घालवणार…’, उमेश कामतच्या पोस्टने वेधले लक्ष

हे देखील वाचा