‘कपिल शर्मा शो‘ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे प्रत्येकाला गेस्ट व्हायचे असते. मंत्र्यापासून स्वामींपर्यंत सर्वांनाच कपिलचा शाे आवडतो. कपिलने त्याच्या विनोदी स्वभावाने पाहुणे आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कॉमेडी किंगच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये माेठ – मोठ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव जोडले जात आहे. त्यामुळे कॉमेडी किंगच्या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहुणे म्हणून येणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
नरेंद्र माेदी यांनी कपिलच्या निमंत्रणावर दिले हे मजेशीर उत्तर
एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा कपिल शर्माला (kapil sharma) विचारण्यात आले की,’ मोदीजी कधीतरी त्याच्या शोमध्ये यावेत असे तुम्हाला वाटते का? यावर उत्तर देताना टीव्हीचा टॉप स्टँड-अप कॉमेडियन म्हणाला, “जेव्हा मी स्वतः पंतप्रधान मोदींना भेटलो, तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘सर, कधीतरी आमच्या शोमध्ये या.’ त्यावेळी त्यांनी मला नकारही दिला नाही, ते म्हणाले, ‘आता माझे विरोधक खूप कॉमेडी करत आहेत…पण कधीतरी येईल.’
View this post on Instagram
कपिलचा ‘झ्विगाटो’ चित्रपट लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला
यादरम्यान कपिल शर्माने त्याच्या आयुष्यातील डार्क फेज बद्दलही सांगितले. ताे म्हणाले की, “एक वेळ अशी आली हाेती की, मी आत्महत्येचा विचार करू लागलो. या जगात आपलं कुणीच नाही असं मला वाटत होतं.” कपिल शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कपिलचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपट 17 मार्चला रिलीज होणार असून सध्या ताे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(bollywood actor kapil sharma pm modi will be guest on the kapil sharma show when the comedian invite the prime minister narendra modi gave this answer)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करीनाने लग्नाबद्दल शेअर केले तिचे विचार; म्हणाली, ‘अभिनेत्रीसाठी सर्वात मोठा टॅबू…’
अमृता फडणवीस यांच्या खांद्यावर बसलेल्या पोपटाने वेधलं लक्ष, त्याची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क