Monday, June 17, 2024

कपिल शर्मा शोवर भडकला ‘हा’ अभिनेता, शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या खोट्या कमेंट्स विरोधात केली पोस्ट

‘द कपिल शर्मा शो’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. आतापर्यंत या शोचे अनेक सिझन येऊन गेले आहेत. प्रेक्षकांनी प्रत्येक सिझनला भरभरून प्रतिसाद दिला मात्र नुकताच या शोचा प्रदर्शित झालेला एक भाग चांगलाच वादात अडकला आहे. कपिल शर्मा लोकांना खळखळून हसवताना दिसतो. त्याच्या शोची प्रत्येक जणं आतुरतेने वाट बघत असतात. मात्र खऱ्या आयुष्यात कपिल शर्मा सतत वादांमध्ये अडकताना दिसत असतो. कपिल शर्मा आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे.

आता पुन्हा एकदा कपिल शर्मा नवीन एका शोमध्ये अडकला आहे. कपिल शर्मावर डब्ल्यूडब्ल्यूई पहिलवान सौरव गुर्जर भडकला आहे. सौरव ब्रह्मास्त्र आणि टीव्ही शो महाभारतात दिसला आहे. नुकताच कपिल शर्माच्या शोमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर त्यांच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचले होते. यावेळी शोमधील एका सेगमेंटमध्ये नेहमी कलाकारांच्या सोशल मीडिया पोस्टवर नेटकऱ्यांनी केलेल्या भन्नाट कमेंट्स दाखवल्या जातात. यावेळी देखील त्या दाखवल्या गेल्या.

या फोटोंमध्ये रणबीरचा एक फोटो सौरव गुर्जरसोबत होता. हा फोटो ते जेव्हा ब्रह्मास्त्र शूट करत होते, तेव्हाच होता. या फोटोमध्ये ते दोघं जिममध्ये दिसत आहे. फोटोत रणबीर सौरवच्या पाठीवर बसलेला दिसत होता. या फोटोसोबत सौरवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शोची एक क्लिप शेअर केली आहे. त्याने या फोटोवर आलेल्या सर्व कमेंट्स खोट्या असल्याचे सांगितले आहे. सौरवने त्याच्या ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “तू खूप चांगला माणूस आहे, कपिल शर्मा लोकांना हसवतो मात्र तू आणि तुझी टीम हे खोटे कमेंट्स कशा काय दाखवू शकतात? कोणाच्याही सोशल मीडिया अकाऊंटवर हे खपवून घेतले जाणार नाही. जय हिंद.”

सौरव गुर्जरच्या या पोस्टवर सतत प्रतिक्रिया येत आहेत. टीव्हीवर खोट्या कमेंट्स दाखवल्यामुळे आता नेटकरी कपिल शर्माला चांगलेच ऐकवत आहे. अनेकांनी या खोट्या कमेंट्स दाखवल्यामुळे त्याला फटकारत त्याचा क्लास घेतला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी  

हाेळीच्या रंगात रंगली श्वेता शिंदे

हे देखील वाचा