Wednesday, June 26, 2024

करण देओल अन् द्रिशा आचार्य अडकले लग्न बंधनात, नवीन जाेडप्याचे सुंदर फाेटाे एकदा पाहाच

बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल अखेर त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्न बंधनात अडकला आहे. अशात करण आणि द्रिशाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल हाेत आहेत.

करण (karan deol) आणि द्रिशा (drisha acharya) यांचे लग्न बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक आहे. करणच्या लग्नाची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. तीन दिवस चाललेल्या या विवाह सोहळ्याचे व्हिडिओ आणि फाेटाेही इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. अशात आज म्हणजेच रविवारी (18 जुन)ला दोघेही लग्न बंधनात अडकले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by INDIAN GROOM (@indiangroom)

लग्नाच्या फोटोंमध्ये, करण आणि द्रिशा फुलांनी सजलेल्या मंडपामध्ये बसून लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहेत. अशात निर्माते बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्य लाल रंगाच्या लेंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. द्रिशाने एक ओढणी बाजूला घेतला आहे आणि दुसरा डोक्यावर घेतला आहे. अशात द्रीशा कमीत कमी मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर, करण त्याच्या लेडी लव्हसोबत ऑफ व्हाइट आउटफिटमध्ये देखणा दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करण देओल घोडीवर बसून लग्नस्थळी पोहोचला. यावेळी नवरदेवासाेबत त्याचे वडिल सनी देओल आणि आजाेब धर्मेंद्र यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी बारातीसाेबत नवरेव आणि वडिल सनी देओल भांगड्यावर नाचताना दिसले.

करण देओलच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ‘पल पल दिल के पास’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करण अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शकही आहे. त्याने ‘यमला पगला दीवाना 2’ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.(bollywood actor karan deol drisha acharya first wedding photo sunny deol daughter in law look gorgeous in red lehenga )

अधिक वाचा- 
स्वरा भास्करने एयरपोर्टवर पतीसोबत केल ‘हे’ कृत्य; चाहते म्हणाले, ‘तु नेहमीच…’
तमन्नाच्या फोटोंनी चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एकदा फाेटाे पाहा

हे देखील वाचा