Thursday, June 13, 2024

स्वरा भास्करने एयरपोर्टवर पतीसोबत केल ‘हे’ कृत्य; चाहते म्हणाले, ‘तु नेहमीच…’

अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच तिच्या विविध सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वीच स्वराने समाजवादी पक्षाचे नेता फहाद अहमद यांच्याशी लग्न केल आहे. या लग्नानंतर ती सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तिच्याबद्दल नेहमीच विविध बातम्या किंवा अफवा उठतच असतात. नुकतीच काही दिवसांपुर्वी स्वराने आई होणार असल्याचे सोशल मीडियावर जाहिर केले. त्यावेळी तिने काही बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

स्वरा (swara bhaskar) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भन्नाट कमेंट करत असतात. स्वरा भास्कर तिच्या प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच लोकांसमोर आली आहे. अभिनेत्री स्वरा मुंबई एयरपोर्टवर दिसलीआहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे.

यावेळी स्वरा पापाराझींना वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. अभिनेत्री स्वरा तिचा बेबी बंपही फ्लॉंट करताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्वराचे सौदर्य खूपच खुलून दिसत आहे. पापाराझींसाठी पोज देतानाही ती खूप आनंदी दिसत आहे. त्याचवेळी, एयरपोर्टच्या आत प्रवेश करण्यापूर्वी स्वराने तिचा नवरा फहादला प्रेमाने मिठी मारली. इतकंच नाही तर स्वराने त्याला किस देखील केल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

स्वराच्या या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘तु नेहमीच गोड दिसतेस’. दुसऱ्याने लिहिले की, खरच तु प्रेग्नेंट आहे का?, तर काहींनी ती लग्नाच्या आगोदरच प्रेग्नेंट असल्याच म्हटले आहे.

स्वराने कोर्ट मॅरेजनंतर रितीरिवाजानुसार लग्न केले. यानंतर त्यांनी एक रिसेप्शन पार्टीही ठेवली होती. यावेळी बॉलिवूडपासून राजकारणापर्यंतचे सर्व स्टार्स सहभागी झाले होते. आता स्वरा ऑक्टोबरमध्ये मुलाला जन्म देणार आहे. या नव्या प्रवासासाठी स्वरा आणि फहाद दोघेही खूप उत्सुक आहेत. (swara bhaskar flaunts baby bump in black short dress at mumbai airport kisses husband fahad ahmad)

अधिक वाचा-   
शाहरुख-आर्यन पहिल्यांदाच दिसणार एकत्र, ‘या’ शोमध्ये बाप-लेक करणार राडा
दुःखद! प्रसिद्ध हाॅलिवूड अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा 

 

हे देखील वाचा