Wednesday, June 26, 2024

कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू

सध्या बी-टाऊनमधील अनेक स्टार्स लग्नगाठ बांधत आहेत. गेल्या महिन्यात बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​कियारा आडवाणीसाेबत लग्नबंधनात अडकला, ज्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अशातच आता आणखी एक स्टार घोडीवर चढणार असल्याची बातमी समाेर आली आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून कार्तिक आर्यन आहे.

कार्तिक आर्यन (kartik aaryan) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने जाहीर केले आहे की, सर्वांचे लग्न पाहून तोही लग्न करण्याचा विचार करत आहे. शनिवारी (18 मार्च)राेजी मुंबईत आयोजित एका अवॉर्ड नाईटमध्ये कार्तिकने ढोल-ताशांसह मंचावर प्रवेश केला. यानंतर कार्तिक म्हणाला, ‘हॅलो! तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की, मी इथे बँड का आणला आहे.” कार्तिकने हे सांगताच उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. यानंतर अभिनेत्याचे म्हणणे ऐकून लोक हसले.

कार्तिक म्हणाला, “मी इथे बँड का आणला आहे, तर सांगू फोमो? आता बघा ना, बॉलीवूडमध्ये एकामागून एक सर्वांचे बँड वाजत आहेत. सर्व घोडी चढत आहेत. प्रत्येकाच्या विकेट पडत आहेत. मात्र, एक विकेट अद्याप पडली नाही.” कार्तिक पुढे म्हणाला, “आता हवामान बदलत आहे. कणखर माणूस सुद्धा वितळत आहे. लग्नाचे लाडू चाखण्याचा विचारही मनात आला आहे. मी प्रेमाचा पंचनामा केला, अशात आता लग्नाचा पंचनामाही करायचा आहे. म्हणूनच मी या स्टेजला साक्षीदार मानून सर्वांसमोर लग्नाची घोषणा करत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, तो कोणाशी लग्न करतोय, याचा खुलासा त्यांनी अद्याप केला नाही. दुसरीकडे, त्याच्या चाहत्यांनी आधीच त्याच्यासाठी वधू शोधली आहे. कार्तिकने क्रिती सेनॉनसोबत लग्न करावे, अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली आहे.(bollywood actor kartik aaryan announce his marriage jokingly in an award show )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
पडद्याआड सारासाेबत राेमॅंटीक झाली शेहनाज; अभिनेत्री म्हणाली, ‘माझी सर्व लिपस्टिक संपली…’
मलायकाचे अर्जुन कपूरसाेबत अफेअर असतानाही अरबाज का भेटताे अभिनेत्रीला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा