Tuesday, June 18, 2024

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला भविष्यात करायची आहे ‘ही’ भूमिका, स्वतःचा केला त्याचा खुलासा

सध्या सिद्धार्थ मल्होत्रा तुफान चर्चेत आहे. कियारा अडवाणीसोबत लग्न केल्यानंतर तो तुफान गाजत आहे. ७ फेब्रुवारी रोजी त्यांनी राजेशाही थाटात लग्न केले. त्यांच्या या लग्नाची चर्चा बॉलिवूडमध्ये आणि मीडियामध्ये खूप आधीपासूनच होती. त्यांनी अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थिती मीडियापासून लांब लग्न केले. सुरुवातीपासूनच सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच कमी बोलतो. तो त्याचे वैयक्तिक आयुष्यसोडून इतर सर्व मुद्द्यांवर त्याचे विचार स्पष्ट मांडत असतो. आता पुन्हा एकदा एका मुलाखतीदरम्यान त्याचा हाच अंदाज पाहायला मिळाला. त्याने त्याच्या स्टारडमबद्दल आणि करियरबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला की आज जरी त्याला इंडस्ट्रीमध्ये एक दशकांपेक्षा जास्त काळ झाला असला तरी तो नेहमीच नर्वस होतो. या वर्षांमध्ये त्याला लाइमलाईटची सवय झाली आहे. मात्र तो कधीच या मिळणाऱ्या फेमला डोक्यावर चढू देत नाही आणि स्वतःवर हवी होऊ देत नाही. या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तो स्वतःला नशीबवान समजतो की त्याला इथे एवढे प्रेम आणि प्रेरणा मिळते काम करण्यासाठी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

या मुलाखतीमध्ये तो पुढे म्हणाला, एक दिल्लीचा मुलगा म्हणून त्याने नेहमीच अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. आणि आता ते खरे देखील झाले आहे. यासाठी तो नेहमीच सर्वांचा ऋणी असेल. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी त्याला अजून अधिक मेहनत आणि काम करायचे आहे. या क्षेत्रात येण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या पुढच्या करियरबद्दल बोलताना म्हटले की त्याला एक सुपर हिरोचा रोल करायचा आहे. या रोलसाठी त्याला काहीतरी वेगळे आणि मस्त करायला मिळणार हे नक्की आहे. तत्पूर्वी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रा ‘योद्धा’ या सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

हे देखील वाचा