Saturday, June 29, 2024

कार्तिक आर्यनने ‘या’ अभिनेत्रीसोबत ख्रिसमस साजरा करताच चाहत्यांना पडले प्रश्न, म्हणाले…

बॉलिवूडमधील लाेकप्रिय अभिनेत्यापैकी एक कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. कार्तिकने त्याच्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या ह्रद्यात स्थान निर्माण केले. तो अनेकदा चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. कार्तिकचे शेवटचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच हिट झाले. अलीकडेच कार्तिक बॉलिवूड अभिनेत्रीसोबत ख्रिसमस पार्टी करताना दिसला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अलीकडेच कार्तिक (kartik aaryan) याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ख्रिसमस पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक ‘शेहजादा’ चित्रपटातील त्याची को-स्टार क्रिती सेननसोबत पार्टी करताना दिसला. या पोस्टनंतर कार्तिक आणि क्रितीच्या अफेअरच्या चर्चा साेशल मीडियावर हाेऊ लागल्या. कार्तिक आणि क्रिती एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज चाहते लावत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

या फोटोमध्ये कार्तिकने बेबी पिंक कलरचे जॅकेट घातलेले आहे, तर क्रितीने या सेलिब्रेशनसाठी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. कार्तिक अन् क्रितीच्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्याचवेळी, कमेंट करताना काही युजर्सने कार्तिकला त्याच्या आणि क्रितीच्या डेटिंगबद्दल विचारले. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “मला आधीच माहित होते, या दोघांचे अफेअर आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “राजकुमार आणि त्याची राजकुमारी.” एका चाहत्याने तर चक्क कमेंट करत लिहिले, “आम्हाला आमचे ख्रिसमस गिफ्ट मिळाले आहे.”

कार्तिक आर्यानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कार्तिकच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता कार्तिक ‘शहजादा’ चित्रपटात क्रिती सेनॉन आणि ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटात कियारा अडवाणीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. कार्तिकच्या दोन्ही चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (bollywood actor kartik aaryan celebrates christmas 2022 with kriti sanon fans says they are in a relationship)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! अभिनेत्री हिंमाशी खुरानाची प्रकृती चिंताजनक, रुग्नालयात केले दाखल
अजय देवगणच्या लेकीनं घातला डीप नेक ड्रेस; चाहते संतापत म्हणाले, ‘माय-बापानं जास्तच…’

हे देखील वाचा