Friday, July 12, 2024

‘स्टार कीड आणि आमच्यामध्ये भेदभाव केला जातो’, दिग्गज अभिनेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

बॉलीवूडमध्ये नेपोटिझमला स्थान नाही, असे अनेक स्टार म्हणतात. अनेकवेळा यावर चर्चा देखील झाली आहे. सोशल मीडियावर चाहते नेहमीच यावर आपले मत व्यक्त करत असतात. परंतू आता एका दिग्गज अभिनेत्यानेच यावर भाष्य केले आहे. स्टार कीड व ज्यांना कुणीही गॉडफादर नाही त्यांच्यात भेदभाव होतो, असे त्या अभिनेत्याने म्हटले आहे.

प्यार का पंचनामा सिनेमातून बॉलीवूड पदार्पण केलेल्या कार्तिक आर्यनने (kartik Aryan) यावर थेट भाष्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना कार्तिक म्हणाला, ‘नेपोटिझमवर मला फारसे बोलायला आवडत नाही. याआधी सुद्धा मी नेपोटिझवरबद्दल बऱ्याचदा बोललो आहे. बाॅलीवूड मागच्या काही दिवसांपासुन नेपोटिझमुळे चर्चेत आहे. काही सेलिब्रिटी याबद्दल मनमोकळेपणाने बोलतात तर काही बोलण टाळतात.’

याबद्दल बोलण्यासारखे फारसे काही राहिले नाही. कारण हे बदलले जाऊ शकत नाही. हे खूप नॅचरली होत आहे. विशेष म्हणजे तुम्ही याबद्दल काहीच बोलू शकत नाही. प्रत्येकवेळी स्टार कीड आणि इंडस्ट्रीमधील इतर लोकांना समान संधी मिळत नाही,’ असेही तो नेपोटिझमबद्दल बोलताना पुढे म्हणाला.

कार्तिक आर्यनने ‘प्यार का पंचनामा’ या सिनेमातुन बॉलीवूड पदार्पण केले होते. परंतू त्याला खरी ओळख मिळाली ती ‘सोनु के टिटू कि स्वीटी’ या सिनेमामुळे. या सिनेमात त्याने साकारलेला सोनु शर्माचा रोल खूप गाजला. लव आज कल, लुका छूपी, भुलभुलय्या टू असे हिट सिनेमे त्याने बॉलीवूडला दिले आहेत. नुकताच त्याचा चंदू चॅम्पियन हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमासाठी त्याच भरभरून कौतुक केले जात आहे. कार्तिक आर्यन आता तृप्ति डिमरी सोबत ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात विद्या बालन सुद्धा महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कियाराने सिद्धार्थवर केली ‘काळी जादू’, खोट्या बातम्या पसरवून चाहत्याची 50 लाखांची फसवणूक
सलमानच्या हत्येच्या कटासाठी पाकिस्तानातून आणली होती शस्त्रे, पोलिसांच्या आरोपपत्रात मोठा खुलासा

हे देखील वाचा