Friday, July 5, 2024

केआरकेची बॉलिवूड चित्रपटांसाठी अनोखा नियम बनवण्याचे मागणी; म्हणाला, ’80 टक्के नफा सरकारकडे…’

कमाल आर खान हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखला जाताे. बॉलीवूडमधील स्टार्सपासून ते निर्माते-दिग्दर्शकांपर्यंत तो अनेकदा अनेकांवर टिका करताे. याशिवाय तो चित्रपटांचे सेल्फ रिव्ह्यू करतानाही दिसतो. आता केआरकेने सरकारला बॉलिवूडसाठी आणखी एक अनोखा नियम बनवण्याचे आवाहन केले आहे आणि करण जोहरचीही खिल्ली उडवली आहे.

निर्माता करण जोहर, अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन यासारख्या प्रसिद्ध कलाकारांचा समावेश असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन करत जबरदस्त यश मिळवले. मात्र, कमल आर. खान म्हणजेच केआरकेने अनेकदा चित्रपटाचे कलेक्शन फेक असल्याचे सांगितले. आता यावर पुन्हा एकदा केआरकेने ट्विट केले आहे.

केआरकेने करण जाेहरवर साधला निशाना
केआरकेने ट्विट करत लिहिले, “सरकारने असा नियम बनवला पाहिजे की, एका निर्मात्याला चित्रपटातून जास्तीत जास्त 20% नफा मिळेल आणि इतर सर्व नफ्याची रक्कम सरकारकडे जाईल. मग आपोआप प्रत्येक निर्माता त्याच्या चित्रपटाला सुपरफ्लॉप म्हणू लागेल आणि करण जोहर ब्रह्मास्त्राला ऑल टाइम डिजास्टर म्हणले, जे खरे आहे.”

केआरकेच्या ट्विटवर युजर्सने दिल्या प्रतिक्रिया
कमाल आर खानच्या या ट्विटवर युजर्स भिन्नभिन्न प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. केआरकेच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, “सरकारला काय गरज आहे चित्रपट व्यवसायात सहभागी व्हायची? ते गुंतवणूक करत आहेत का? चापलूसीलाही मर्यादा असतात भावा….” तर दुसर्‍याने कमेंट करत लिहिले की,”20% देण्याची गरज नाही, त्याऐवजी घोषित केलेल्या रकमेवर कॉर्पोरेट्सना लागू होणारा कर लावला जाईल. मला वाटते हे पुरेसे आहे.” (bollywood actor krk says government should make rule producer will get max 20 percent from film all other profit will go govt)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इतिहासाचे धडे आणि मनोरंजन एकाच वेळी हवं असेन तर पाहा ‘हे’ चित्रपट
दूध विकण्यासाठी बाहेर पडला सुनील ग्रोवर; कौतुक करत चाहते म्हणाले, ‘साहेब…’

हे देखील वाचा