बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील भांडण कोर्टापर्यंत पोहोचले आहे. अभिनेता आणि त्याची पत्नी दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच आलियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने दावा केला आहे की, नवाजुद्दीनने तिला आणि तिच्या दोन मुलांना त्यांच्या वर्सोवा येथील बंगल्यातून बाहेर काढले आहे. यावर आता अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच नवाजुद्दीनच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने सगळेच थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये आलिया तिच्या पतीवर दावा करताना दिसत आहे की, नवाजने तिला आणि त्यांच्या दोन मुलांना त्यांच्या वर्सोवा बंगल्यातून बेघर केले आहे. या व्हिडिओमध्ये ती शोरा आणि यानी या दोन मुलांसोबत रस्त्यावर फिरत आहे. त्याच्या मुलाने आईला मिठी मारली आहे, तर नवाजुद्दीनची मुलगी रस्त्यावर रडताना दिसत आहे.
आता नवाजने यावर आपले मौन तोडले आहे आणि त्याच्या टीमने म्हटले आहे की, अभिनेत्याने त्याची आई मेहरुन्निसा सिद्दीकी यांना राजमहिला बंगला भेट दिला आहे. अशात अभिनेत्याच्या हातात संपत्तीबाबत निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. नवाजुद्दीनच्या आईच्या केअरटेकरने म्हटले आहे की, प्रॉपर्टीमध्ये फक्त मुलांनाच परवानगी आहे. त्यामुळे आलियाला घरात प्रवेश नाही.
एका व्हिडिओमध्ये आलिया दावा करताना दिसत आहे की, तिच्याकडे राहण्यासाठी दुसरी जागा नाही, परंतु हे खोटे आहे. नवाजने 2016 मध्ये आलियासाठी मुंबईत एक फ्लॅट खरेदी केला होता, जो आलियाने स्वतःच्या इच्छेने भाड्याने दिला होता. व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की, आलियाच्या दाव्यानुसार कोणालाही संपत्तीतून काढून टाकण्यात आलेले नाही आणि हे देखील स्पष्ट आहे की, मुलांना घरात प्रवेश करण्यापासून रोखले गेले नाही.(bollywood actor nawazuddin siddiqui claims he has no decision making power when it comes to entering his mother property )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार
‘आमच्या बेडरुमपर्यंत…’, सैफ पॅपराझींवर संतापत म्हणाला असं काही की, करीनाही बघतच बसली