Saturday, June 15, 2024

अनवाणी पायांनी आलियाने केले असे काही कृत्ये की, व्हिडीओ पाहून युजर्सही थक्क

गेल्या रविवारी (दि. 26 फेब्रुवारी)ला मुंबईत झी सिने अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी, बॉलिवूडपासून टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर आपली उपस्थिती नोंदवली. शाहिद कपूर, रश्मिका मंदान्ना, कियारा अडवाणी, आलिया भट्ट यांच्यासह बॉलिवूडमधील जवळपास सर्वच दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया भट्ट पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. यासोबतच या अभिनेत्रीने आपल्या डान्सने सर्वांची मने जिंकली.

आलिया भट्ट (alia bhatt) कायमच तिच्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांची मने जिंकते. असेच काहीसे गेल्या रविवारी मुंबईत झालेल्या झी सिने पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाले. या अवॉर्ड फंक्शनमध्ये आलियाने तिच्या परफॉर्मन्सद्वराे सर्व उपस्थित स्टार्सची वाहवा मिळवली, अशात आता या अभिनेत्रीच्या डान्स परफॉर्मन्सचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया पांढऱ्या रंगाच्या साडीत ऑस्कर अवॉर्डच्या साेहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

इतकंच नाही, तर आलिया भट्टसोबत सुपरस्टार आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती खुरानाही या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसले. या कलाकारांनी आपल्या एनर्जीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिलेल्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ ट्विटरवर वेगाने व्हायरल हाेत आहे. चाहते आलिया भट्टच्या या परफाॅर्मन्सचे जोरदार कौतुक करत आहेत.

‘गंगूबाई’ गेल्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक
यासाेबतच आलियाने तिच्या ‘गंगूबाई’ चित्रपटातील गाण्यावर डान्स परफॉर्मन्स दिला. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी आलियाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. हा फीमेल लीड चित्रपट गेल्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता.(bollywood actress alia bhatt power packed performance on naatu naatu during an event along with ayushmann and aparshakt khurrana )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुंबई सोडण्यापूर्वी ऋतिकने पॅपराझींसमाेर साबा आझादला केले किस, व्हिडिओ व्हायरल

‘ड्रामाक्विन’ शिकवणार अभिनय? राखीने अकादमीसाठी उचलले माेठे पाऊल, एकदा व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा