बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर मारहाण करणे, खोलीत कोंडून ठेवणे असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. पण, आता या यादीत आणखी एका आरोपाची भर पडली आहे. अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकीने नवाजुद्दीनवर बला’त्काराचा गंभीर आरोप केला आहे. आलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रडत रडत तिची वेदना व्यक्त करत आहे.
आलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, तिने तिच्या बॉलिवूड स्टार पतीविरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय की, नवाजुद्दीने तिची मुले तिच्याकडून हिसकावून घ्यायची आहेत आणि ती सध्या आर्थिक संकटातून जात आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये आलिया म्हणते, “नवाजुद्दीने काल कोर्टात केस दाखल केली आहे, ज्यामध्ये तो म्हणतो की, त्याला मुलाचा कस्टडी हवी आहे. मला तुमच्याकडून फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की, ज्याला कधी मुलाचा भास जाणवला नाही, ना गर्भात जाणवलं, मुलं कशी मोठी होतात? त्यांना लागणारं डायपर कितीला मिळतं? त्यांना कोणते कपडे लागतात? याबाबत नवाजला काहीच माहीत नाही. आज त्याच्याकडील शक्तीचा, पैशाचा वापर करुन त्याला माझ्याकडून मुलांना घ्यायचं आहे. तो त्याच्या सत्तेचा गैरवापर करत आहे. तुम्ही तुमच्या पैशाने कितीही माणसे विकत घेऊ शकता, पण माझी मुले माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही.”
आलिया पुढे म्हणते, “तू मला तुझी पत्नी मानत नाहीस, पण मी तुला नेहमीच माझा नवरा मानत होती. पण, मी ही गोष्ट कदापि सहन करणार नाही. मला पैशाची अडचण आहे आणि तुम्ही माझी मुले माझ्याकडून हिसकावून घेत आहात. याने मला सर्व बाजूंनी कमकुवत केले आहे आणि आता माझी मुले माझ्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो आपल्या सामर्थ्यात इतका आंधळा झाला आहे की, त्याला काहीच समजत नाही. माझ्या एका मुलालाही माहित नाही की, बाप म्हणजे काय?, ते त्याच्यासोबत कसे जगेल. मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की, निर्णय माझ्या बाजूने येईल.” असे आलियाने म्हटलं आहे.(bollywood actor nawazuddin siddiqui estranged wife aaliya siddiqui accuses actor of rape and files police complaint breaks down in tears)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘स्वत:बद्दल अभिमान बाळगायला हवा…’ म्हणत तेजश्री प्रधानाने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत
‘जर मुघल एवढेच विनाशकारी होते तर…’ नसीरुद्दीन शाह यांचे पुन्हा वादग्रस्त विधान