Tuesday, June 25, 2024

‘जर मुघल एवढेच विनाशकारी होते तर…’ नसीरुद्दीन शाह यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

अतिशय ताकदीचे आणि प्रभावी अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये नेहमीच दिग्गज, जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे नाव घेतले जाते. त्यांनी त्यांच्या सकस अभिनयाच्या जोरावर एक वेगळीच उंची गाठली आहे. मोजक्या मात्र अतिशय उत्तम आणि ताकदीच्या भूमिकांमध्ये नसीरुद्दीन शाह आपल्याला दिसतात. सध्या ते त्यांच्या आगामी बहुचर्चित अशा ‘ताज: डिवाइडेड बाय ब्‍लड’ या सिरीजमुळे गाजताना दिसत आहे. अभिनयासोबतच अतिशय बेफाकपणे वक्तव्य देखील ते बऱ्याचदा करताना दिसतात. त्यांच्या अनेक व्यक्तव्यांमुळे त्यांना ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले आहे, मात्र तरीही ते बिनधास्त त्यांना वाटते ते बोलून मोकळे होतात. आता नसीरुद्दीन शाह यांनी पुन्हा एकदा एका गोष्टीवर नाराजी व्यक्त करत एक वक्तव्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Contiloe Pictures (@contiloepictures)

लवकरच नसीरुद्दीन शाह यांची ‘ताज: डिवाइडेड बाय ब्‍लड’ ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. सध्या ते या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच दरम्यान त्यांनी एक असे विधान केले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लावू शकते. एका मुलाखतीदरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले की, “जिथे इतिहासाबद्दल लोकांना बरोबर माहिती आणि योग्य तर्क नसतो, तिथे तिरस्कार आणि चुकीच्या माहितीचे साम्राज्य असते. कदाचित हेच कारण आहे की, देशातील एक वर्ग भूतकाळाबद्दल खासकरून मुघल साम्राज्यावर दोष देताना दिसत आहे. आता यावर मला राग नाही येत तर हसू येते.”

पुढे नसीरुद्दीन शाह म्हणाले, “जर मुघल साम्राज्य एवढेच राक्षसी आणि विनाशकारी होते तर त्यांचा विरोध करणारे त्यांनी बनवलेले स्मारकं का पाडत नाही. त्यांनी जे काही केले ते भयानक होते तर मग ताजमहल पाडा. लाल किल्ला पाडा, कुतुब मिनार पाडा. लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो, तो तर मुघलांनी बांधला होता. आपल्याला त्याचा गौरव करण्याची गरज नाही आणि खरं तर आपल्याला त्याची बदनामी करण्याचीही गरज नाही”

तत्पूर्वी नसीरुद्दीन शाह यांची नवीन वेब सीरिज ‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ लवकरच प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये नसीरुद्दीन यांनी राजा अकबराची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये मुघल राजा- महाराजांचे कामकाज आणि त्यांच्या उत्तराधिकारांवर आधारीत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

हे देखील वाचा