Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

नवाजुद्दीनच्या पत्नीवर त्याच्याच वकिलाने लावले गंभीर आरोप, वाच काय आहे संपुर्ण प्रकरण

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2020 मधील त्याचा आणि त्यांची पत्नी आलिया उर्फ ​​झैनब यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या आईने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तिच्या सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली होती, ज्यानंतर पोलिसांनी नवाजुद्दीनच्या पत्नीची चौकशी केली होती.

नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) याच्या पत्नीने अभिनेत्याच्या कुटुंबीयांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. अशात आता अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील जफर जैदी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी अभिनेत्याच्या पत्नीवर अनेक आरोप केले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, नवाजुद्दीनच्या वकिलाने सांगितले की, ‘वर्ष 2001 मध्ये आलिया उर्फ ​​अंजली कुमारी हिने आठव्या वर्ग नापास झाले असताना विनय भार्गवशी लग्न केले. त्यानंतर ती मुंबईत आली आणि 2010 मध्ये अंजना आनंद पांडे बनली. त्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि ती झैनब झाली.’

नवाजुद्दीन सिद्दीकीशी लग्न केल्यानंतर 2011 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला, पण जेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकीच्या करिअरला सुरुवात झाली, तेव्हा ती आलियाच्या रुपात त्याच्या आयुष्यात परतली. 2020 मध्ये, तिने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली, याचा अर्थ असा होतो की दोघे आधीच वेगळे झाले आहेत आणि त्याचा काहीही अर्थ नाही.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलाने पुढे सांगितले की, ‘अंजनाने 2008-2009 मध्ये राहुल नावाच्या आणखी एका व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला होता, ज्याच्यासोबत ती मुंबईच्या गोरेगावमध्ये राहात होती. मात्र, मोठं होण्याच्या इच्छेने तिने एक गॅंग बनवली, ज्यामध्ये अंजनाची बहीण अर्चना पांडेही सामील आहे.

अशात अंजना पांडे मुंबईत राहून तिची स्वप्ने पुर्ण करत होती. तर विनय भार्गवने जबलपूरमध्ये अंजनाच्या बहिणीशी लग्न केले. मात्र, अर्चना भार्गवचे राजकुमार शुक्ला याच्याशी आधीच लग्न झाले होते, ज्यांच्याशी तिचा घटस्फोट झालेला नव्हता. विनय भार्गव यांनी आपल्या पत्नीचे नाव अंजना म्हणून रेल्वे विभागात नोंदवले होते. त्यावेळी हे तिघेही रेल्वे विभागाची फसवणूक करत होते.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे लग्न 2011 मध्ये झाले होते. दोघांना दोन मुले आहेत. आलियाच्या वकिलाने गेल्या महिन्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबावर तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, पत्नीसोबत सुरू असलेल्या या वादानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने आपले मुंबईतील घर सोडले आहे आणि तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये राहत आहे.(bollywood actor nawazuddin siddiqui lawyer reply back at aaliya claims in between property dispute controversy )

हे देखील वाचा