Sunday, April 14, 2024

नवाजुद्दीनला ट्रान्सजेंडरच्या भूमिकेसाठी मेकअप करायला लागाचये 3 तास , पाहा भन्नाट व्हिडिओ

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या ‘हड्डी’ या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. याच चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून नवाजुद्दीनच्या व्यक्तिरेखेची सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच नवाजुद्दीनने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नवाजुद्दीन (nawazuddin) याच्या ‘हड्डी’ (haddi) चित्रपटातील लूकने चाहत्यांना जबरदस्त चकित केले आहे. फर्स्ट लूक समोर आल्यावर कोणालाच ओळखता आले नाही की, ही सुंदरी कोण आहे? नवाजुद्दीन असा कलाकार आहे, जो प्रत्येक पात्रात जीव ओततो. आता तो पूर्णपणे ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये नवाजुद्दीन त्याच्या लूकसाठी कशी तयारी करतो हे दाखवण्यात आले आहे. सध्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी त्याचीच सर्वत्र चर्चा आहे. नवाजुद्दीन या चित्रपटात त्याच्या व्यक्तिरेखेसाठी कशाप्रकारे मेहनत घेत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

नवाजुद्दीनला मेकअप करायला लागायचे 3 तास
‘हड्डी’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अभिनेता एका महिलेच्या भूमिकेत दिसला होता. त्या व्यक्तिरेखेत अभिनेत्याला पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आता नवाजुद्दीनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नवाजुद्दीन या भूमिकेतून धमाल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या लूकसाठी अभिनेत्याला तयार हाेण्यासाठी 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागत होता. नवाजुद्दीनने त्याच्या व्यक्तिरेखेसाठी किती मेहनत घेतली असेल, हे व्हिडिओवरून स्पष्ट होते. आपल्या आवडत्या अभिनेत्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा व्हिडिओ पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. (bollywood actor nawazuddin siddiqui makeup video reveal transformation for haddi transgender role)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कहरच! उर्फिने शेअर केला लेटेस्ट व्हिडिओ; स्वतःलाच म्हणाली, ‘बेशरम, हास्यास्पद, अश्लील…’

ओंकार भोजने प्रथमच मुख्य भूमिकेत! ‘सरला एक कोटी’मध्ये साकारणार हटके रोल

हे देखील वाचा