हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जाणारा नवाजुद्दीन सिद्दिकीने नुकताच ‘अफवाह‘ या चित्रपटाद्वारे सिनेगृहांमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याचा हा चित्रपट काही विशेष कामगिरी दाखवू शकला नाही. अशात प्रेक्षकांचे मनोरंजन अबाधित ठेवत नवाजुद्दीन या महिन्यात आणखी एका चित्रपटासह लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. काेणता आहे ताे चित्रपट? चला, जाणून घेउया…
‘जोगीरा सारा रा रा’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर यापूर्वीच प्रदर्शित झाला आहे. अशात आता निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन गाणे ‘बबुआ’ देखील रिलीज केले आहे, ज्यामध्ये नवाजुद्दीन आणि नेहा शर्मा मस्ती करताना दिसत आहेत. टॉर्चर आणि कॉकटेल या चित्रपटाची दोन गाणी यापूर्वीच रिलीज झाली आहेत, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
NAWAZUDDIN SIDDIQUI – NEHA SHARMA: ‘JOGIRA SARA RA RA’ NEW SONG… #NawazuddinSiddiqui and #NehaSharma feature in the new song from #JogiraSaraRaRa: #Babua… Directed by #KushanNandy… In *cinemas* 12 May 2023… Song ????: https://t.co/AA89Naqd4W#JogiraSaraRaRa also features… pic.twitter.com/r5LLXOHlId
— taran adarsh (@taran_adarsh) May 8, 2023
या गाण्याची सुरुवात नवाजुद्दीनपासून होते, जे मस्तीच्या अंदाजात दिसत आहे, पण यासाेबत ते घरातील बायकांनाही कंटाळलेले आहेत. कधी नेहा शर्मा त्याला रोलिंग पिनने त्रास देते, तर कधी त्याला आणखी कशावरून त्रास दिला जात असल्याचे दिसत आहे. गाण्यात नेहा आणि नवाजुद्दीनच्या हॅप्पी मेमरीज देखील दाखवण्यात आल्या आहेत. नेहा आणि नवाजुद्दीन व्यतिरिक्त या गाण्यात जरीना वहाब, संजय मिश्रा आणि महाक्षय चक्रवर्ती सारखे कलाकार आहेत.
View this post on Instagram
‘जोगिरा सारा रा रा’ हा कुशन नंदी दिग्दर्शित रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटातील ‘बबुआ’ हे गाणे सुवर्णा तिवारी आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. गाण्याचे बोल लवराज यांनी लिहिले आहेत, तर संगीत हितेश मोडक यांनी दिले आहे. नईम सिद्दीकी यांनी चित्रपटाच्या निर्मितीचे काम सांभाळले आहे. अशात हा सिनेमा 12 मे राेजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. (Bollywood actor nawazuddin siddiqui neha sharma upcoming film jogira sara ra ne song babua out )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सरी या मराठी चित्रपटात वाजतंय ब्लॉकबस्टर ‘कांतरा’च्या संगीतकाराचे संगीत
बकेटसारखी बॅग घेऊन गेल्याने अनन्या पांडे ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, ‘तिची बॅग तिच्या संघर्षा इतकी…’