बॉलीवूडमधील सुपरस्टार नवाजुद्दीन सिद्दिकी हा टिपीकल अभिनेत्यांसारखा दिसणारा कलाकार नाही. परंतू त्याने त्याच्या अभिनयाने आज प्रत्येकाच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. कोणताही चित्रपट असो, वेबसिरीज असो किंवा अगदी थेटरवर देखील त्याने त्याच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्याचा अभिनय पाहून सगळेजण चकित होतात. त्यामुळे खूप कमी कालावधीत त्याचे लाखोंमध्ये फॅन फॉलोविंग झाले आहे. सध्या नवाजुद्दिन याचे ‘स्वॅगी चुडीया’ हे गाणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो अत्यंत वेगळ्या अंदाजात दिसत आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याचे हे गाणे खूपच आवडले आहे.
नवाजुद्दीन सिद्दिकीने संगीत क्षेत्रात हातभार लावलेला दिसत आहे. त्याच्या ‘बोले चुडिया’ या चित्रपटातील ‘स्वॅगी चुडिया’ हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्यात तमन्ना भाटिया,कबीर दुहन सिंग आणि राजपाल यादव हे मुख्य भूमिकेत आहेत. ‘स्वॅगी चुडिया’ हे गाणे झी म्युझिकवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत, तर सनी इंदर यांनी या गाण्याला कँपोस केले आहे.
नवाजुद्दीन सिद्दिकी आकांक्षा शर्मा आणि सनी इंदर यांनी या गाण्याला गायले आहे. एक गायक म्हणून नवाजुद्दीनचे टॅलेंट पहिल्यांदाच गाण्यामधून समोर आले आहे. या गाण्यात नवाजुद्दीन एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. त्याने या गाण्यात हातात बांगड्या आणि सलवार सूट घातलेला दिसत आहे.
नवाजुद्दीनने आपल्या या नव्या प्रयोगाबद्दल बोलताना सांगितले होते की, “मी कौतुक मिळवण्यासाठी नेहमीच एक वेगळा आणि हटके अंदाज करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या भावाने मला त्याच्या चित्रपटातील गाण्याबद्दल विचारणा केली, तेव्हा मी क्षणाचाही विलंब न लावता होकार दर्शवला. कारण मला नेहमीच काहीतरी वेगळे करायचे आहे. त्यामुळे मी माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेर जाणून कायतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. मला आशा आहे की, जशी मला या गाण्याची शूटिंग करताना मजा आली आहे, तशीच तुम्हाला देखील येईल.”
हेही वाचा-
–पुन्हा पोलीस! सिंघम अजय देवगन पुन्हा एकदा साकारणार पोलीस, या वेबसिरीजमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत
–चतुरस्त्र नट हरपला! अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा
–या अभिनेत्रीने चित्रपटात दिले होते सर्वाधिक रेप सीन; वयाच्या २७ व्या वर्षीच झाला होता जीवघेणा आजार