Wednesday, June 26, 2024

नवाजुद्दीनच्या मुलांना रस्त्यावर रडताना पाहून अभिनेत्याच्या भावाने केले ट्विट; म्हणाला, ‘बच्चे को तो बक्श दो…’

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या वैवाहिक जीवनात गेल्या काही दिवसांपासून अनेक चढ-उतार सुरु आहेत. यादम्यान अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने पुन्हा काही व्हिडिओ शेअर केले आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नवाजुद्दीनचा मुलगा आणि मुलगी आलियासाेबत घराबाहेर रस्त्यावर उभे असल्याचे दिसत आहे. अशात नवाज आपल्या पत्नीसोबत कायदेशीर लढाई लढत असताना, त्याचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी देखील अभिनेत्याच्या विरोधात उभा असल्याचे दिसत आहे.

आलिया (aaliya siddiqui) हिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक अभिनेतेच्या विरोधात उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी नवाजुद्दीनचा भाऊ पुन्हा एकदा सोशल मीडियावर अभिनेत्याच्या विरोधात समोर आला आहे. आलियाला रडताना पाहून भाऊ शमासही नवाजुद्दीनच्या विरोधात गेला आणि त्याने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘बच्चे को तो बक्श दो नवाजुद्दीन.’

नवाजुद्दीनने त्याच्या वर्सोव्यातील घरात पत्नी आणि मुलांना एंट्री दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आलियाने तिचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती म्हणतेय की, “मी नवाजच्या बंगल्यावरून आली आहे. माझी मुल रडत आहे, ती खूप अस्वस्थ होत आहे. आम्हाला बंगल्यातून हाकलून देण्यात आले आहे. ‘तुम्ही या बंगल्यात येऊ शकत नाही’, असे सांगण्यात आले आहे. मला समजत नाही, माझ्याकडे हॉटेल नाही, माझ्याकडे राहण्यासाठी घर नाही, मी माझ्या मुलांना कुठे घेऊन जावे हे मला माहित नाही. माझी मुलगी अस्वस्थ होत आहे. नवाज तू माझ्या मुलांशी जे काही करत आहेस त्याबद्दल मी तुला कधीच माफ करू शकत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

शमास आणि नवाजुद्दीन यांच्यात बऱ्याच दिवसांपासून मुझफ्फरनगरच्या बुढाणा येथील वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद सुरू आहे. मुझफ्फरनगरच्या बुढाना तहसीलमध्ये पोहोचल्यानंतर नवाज आपली वडिलोपार्जित मालमत्ता सहा भावांना हस्तांतरित करणार असल्याची बातमी होती, ज्यांना भाऊ शमासने खोटारडे आणि नाटककार म्हणून संबोधले आहे. अशात हे प्रकरण पुढे काय वळण घेते हे पाहण्यासारखे ठरणार.(bollywood actor nawazuddin siddiqui wife aaliya siddiqui brother shamas lashed out at the actor for dragging the kids)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
2020 हे वर्ष ठरले सारा अली खानसाठी वाईट; अभिनेत्री म्हणाली, “माझं ब्रेकअप अन्…”

‘हे’ सुपरस्टार आजही करतात शेती, कलाकार म्हणतो की, ‘शेण उचलल्याशिवाय दिवस सुरू होत नाही….,’

हे देखील वाचा