Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड 2020 हे वर्ष ठरले सारा अली खानसाठी वाईट; अभिनेत्री म्हणाली, “माझं ब्रेकअप अन्…”

2020 हे वर्ष ठरले सारा अली खानसाठी वाईट; अभिनेत्री म्हणाली, “माझं ब्रेकअप अन्…”

बाॅलिवूड दिग्गज कलाकार सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक अभिनेत्री सारा अली खान हिने 2018 मध्ये ‘केदारनाथ‘ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट पडद्यावर सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर अभिनेत्री ‘सिम्बा‘मध्ये दिसली आणि 2020मध्ये तिने ‘लव्ह आज कल‘, ‘कुली नंबर 1‘ या चित्रपटात काम केले, पण हे चित्रपट रुपेरी पडद्यावर फ्लॉप ठरले. अशात आता सारा याबद्दल उघडपणे बोलली आहे.

नुकतीच सारा अली खान (sara ali khan) एका चॅट शोचा भाग बनली होती. जिथे तिने सांगितले की, “2020 हे वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होते. वर्षाची सुरुवात माझ्या ब्रेकअपने झाली आणि ते पुढे आणखीन वाईट ठरत गेले. 2020 मध्ये माझे काही चित्रपट फ्लॉप झाले हाेते. मात्र, त्यामुळे माझ्यावर ट्रोलिंगचा फारसा परिणाम झाला नाही. कारण, मी आधीच खराब पर्सनल स्पेसमध्ये होती.”

‘लव्ह आज कल’ या चित्रपटादरम्यान, सारा आणि कार्तिकबद्दलच्या बातम्या आल्या होत्या की, दाेघेही एकमेकांना डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, 2020 मध्ये चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद केले. दोघांनीही त्यांचे नाते मीडियासमोर कधीच स्वीकारले नव्हते. मात्र, गेल्या वर्षी करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हे गुपित उघड केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा अली खानच्या वर्क फ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर अभिनेत्री शेवटची आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ मध्ये दिसली होती, जी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती. सारा लवकरच ‘गॅसलाइट’, ‘ए वतन मेरे वतन’, ‘मेट्रो इन दिनों’ आणि ‘मर्डर मुबारक’मध्ये दिसणार आहे.(year 2020 was very bad for bollywood actress sara ali khan the actress said neither the films worked )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुष्मिता सेनबाबत धक्कादायक ब्रेकिंग! आधी हार्ट अटॅक आणि आता गंभीर आजार, ढसाढसा रडली अभिनेत्री – व्हिडिओ

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याला अत्यंत दुर्मिळ आजाराची लागण, एकसाथ डोळे मिटवणे अशक्य, रुग्णालयात उपचार सुरु

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा