बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने पुन्हा एकदा आपल्या वैवाहिक जीवनात न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पती आणि सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या आलियाने आता सासरच्या घरात होणारे अत्याचार संपूर्ण जगाला दाखवून दिले आहेत. आलियाने तिच्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिला नवाजुद्दीनच्या घरातील हॉलमध्ये राहण्यास भाग पाडले जात आहे. एवढेच नाही तर तिच्या मुलांनाही दुबईहून परतल्यानंतर हॉलमध्ये सोफा फोल्ड करून झोपावे लागत आहेत.
आलिया सिद्दीकी (aaliya siddiqui) हिने तिच्या साेशल मीडिया अकाऊंटवर एका व्हिडिओद्वारे तिची अवस्था जगाला दाखवली आहे. आलियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “गेल्या 7 दिवसांपासून मला माझ्याच नवऱ्याच्या घरात हॉलमध्ये झोपायला आणि राहण्यास भाग पाडले जात आहे. नुकतीच दुबईहून परतलेली माझी मुलं हॉलमध्ये सोफा फाेल्ड करून झोपली आहेत. पाहुण्यांसाठी असलेल्या छोट्या बाथरूमचा वापर करून मी कसे तरी माझे काम चालवत आहे. जेवण नाही, झोप नाही आणि या सगळ्यांसोबतच माझ्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरेही लावले आहेत.”
View this post on Instagram
आलियाने या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “कोणतीही शांतता नाही आणि गोपनीयता नाही. सर्व 7 बेडरुम माझ्या सासरच्या लोकांनी लॉक केले आहेत आणि माझा पती नवाजुद्दीन सिद्दीकीशी माझा कोणताही संपर्क होऊ देत नाही आहेत. जेणेकरून या परिस्थितीत तो उठून माझी बाजू घेईल. माझ्या वकिलालाही कायदेशीर कागदपत्रांवर माझी स्वाक्षरी घेऊ दिले जात नाही आहे. माझ्या सासरच्यांचा अत्याचार कधी संपणार का? न्यायाच्या प्रतीक्षेत…”
आलिया सिद्दीकीच्या या पोस्टवर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इतकंच नाही तर अनेक लोक आलियाला मदतही करत आहेत. दरम्यान, आलियाच्या वकिलाने एक निवेदन जारी करून तिची परिस्थिती मांडली आहे. वकिलाने सांगितले की, आलिया आणि तिच्या अल्पवयीन मुलांना सिद्दिकीच्या घरी पाळत ठेवण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीनची पत्नी आलिया आणि त्याच्या आईमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी सून आलियाविरुद्ध जबरदस्तीने घरात घुसल्याची तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात पोलिसांनी भादंवि कलम 452, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता. नवाजुद्दीनच्या पत्नीचे खरे नाव अंजना किशोर पांडे होते, परंतु लग्नानंतर तिने तिचे नाव बदलून आलिया जैनब ठेवले.(bollywood actor nawazuddin siddiqui wife aaliya siddiqui claims no food no bed no bathroom in her husband house)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
Union Budget 2023| अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अर्थसंकल्पावर आरोह वेलणकरने शेअर केलं ट्वीट; म्हणाला…
‘या’ दिवशी येणार यश चाेप्रा यांच्यावर आधारित डॉक्युमेंट्री, 35 सेलिब्रिटी सांगणार कथा