Friday, March 29, 2024

Union Budget 2023| अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अर्थसंकल्पावर आरोह वेलणकरने शेअर केलं ट्वीट; म्हणाला…

मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर याने अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वी आरोह बिग बॉस मराठी पर्व 4 चा देखिल स्पर्धक होता. तो चांगली खेळी खेळला होता त्याच्यासाठी त्याचे कौतुकही झालं होतं मात्र, काही आठवड्यात अभिनेता बाहेर आलां. आरोह अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता ज्यावर आरोहने आपलं मत व्यक्त केलं आहे.

आघाडीचा अभिनेता म्हणजेच आरोह वेलणकर (Aroha Velankar) याने मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. (Union Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2023-24 साठीचा देशाचा केंद्रीय अंर्थ संकल्प सादर केला होता . यामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर राजकारणीच नाही तर मनोरंजन क्षेत्रामधील मंडळी देखिल आपलं मत व्यक्त करताना दिसत आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आरोहने ट्वीट शेअर करत लिहिले की, “सकारात्मक अर्थसंकल्प. अर्थपूर्ण आणि दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प सादर केल्याबाबत निर्मला सीतारमण यांचे आभार.” आरोहने सितारमण यांचं कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.

आरोह सोबतच अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi ) याने देखिल त्याच मत व्यक्त केलं आहे. त्याने ट्वीट शेअर करत लिहिले की, “….आज सगळेच experts आहेत !” #Budget असे ट्वीट स्वप्निलने केलं आहे. स्वप्निलने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-

‘या’ दिवशी येणार यश चाेप्रा यांच्यावर आधारित डॉक्युमेंट्री, 35 सेलिब्रिटी सांगणार कथा
वनिता खरातला लग्नात मिळाली खास भेट, प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा