Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘गॅस सिलिंडरने बंगालींसाठी मासे शिजवणार का?’, परेश रावल यांचे वादग्रस्त वक्तव्य, मागितली माफी

‘गॅस सिलिंडरने बंगालींसाठी मासे शिजवणार का?’, परेश रावल यांचे वादग्रस्त वक्तव्य, मागितली माफी

बॉलिवूड अभिनेता परेश रावल गुजरात निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत आहेत. मात्र, प्रचारादरम्यान त्यांनी बंगाली लोकांबद्दल केलेल्या टिकेमुळे ते वादात सापडले आहेत. महागडे गॅस सिलिंडर बंगालींना जोडून त्यांनी असे विधान केले की, ते टीकेचे बळी ठरले, त्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे.

अभिनेता परेश रावल (paresh rawal ) यांनी आपल्या भाषणादरम्यान गुजरातमधील जनता महागाई सहन करेल, पण शेजारील बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सहन करणार नाही, असे म्हटले होते. तेव्हापासून त्यांना टीकेचा सामना करावा लागला. ते म्हणाले होते की, “गॅस सिलिंडर महागले आहेत, तर किंमती कमी होतील. लोकांना रोजगारही मिळेल, पण जेव्हा रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी दिल्लीसारखे तुमच्या जवळ राहू लागतील तेव्हा काय होईल. गॅस सिलेंडरचे काय कराल? बंगालींसाठी मासे शिजवणार का?”

पुढे ते म्हणाले होते की, “गुजरात हे सहन करू शकतो, पण हे नाही. विरोधक ज्या प्रकारे शिवीगाळ करतात, त्यामधून एखाद्याच्या तोंडावर डायपर घालणे आवश्यक आहे. अभिनेत्याने रॅलीत कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्याचे लक्ष्य अरविंद केजरीवाल यांच्यावर होते. ते म्हणाला, “तो खासगी विमानाने येतो आणि दाखवण्यासाठी इथे रिक्षात बसतो. अभिनयात आपण संपूर्ण आयुष्य घालवले आहे, पण अशी नौटंकी पाहिली नाही. शाहीन बागेत त्यांनी बिर्याणी सर्व्ह केली.” तरीदेखील तेथेच परेश रावल यांच्या बंगालींसाठीच्या वक्तव्याला लोकांनी द्वेषयुक्त भाषण म्हटले आहे.

मात्र, आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागताना परेश रावल म्हणाले, “अर्थातच मासे हा मुद्दा नाही आणि गुजरातचे लोकही मासे शिजवतात, पण मला माझा मुद्दा स्पष्ट करायचा आहे. इथे माझा अर्थ बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या असा होतो. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो.”

परेश रावल यांच्या चित्रपट काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘संजू’ , ‘तुफान’, ‘हंगामा 2’, ‘भुल भुलैया’, ‘ओह माय गॉड’ यासारखी दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिली. (bollywood actor paresh rawal apologises for his remark will you cook fish for bengalis on cheap gas cylinders)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आराेप; म्हणाली, ‘सिगारेटचे चटके देऊन…’
‘सिद्धू दादा लव्ह यू’, सिद्धार्थ जाधवच्या ऍक्टिंगचा रणवीरही बनला फॅन; चाहत्यांना म्हणाला, ‘सिनेमा पाहाच’

हे देखील वाचा