Wednesday, December 6, 2023

सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आराेप; म्हणाली, ‘सिगारेटचे चटके देऊन…’

बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सलमान खान याच्यासोबतचा तिचा जुना फोटो शेअर करत पुन्हा एकदा अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. सोमी अलीने सलमान खानवर मारहाणीचा आरोप केला आणि काही वेळाने तिची पोस्ट हटवली. इतकेच नाही, तर सोमी अलीने सलमान खानला सपोर्ट करणाऱ्या अभिनेत्रींवरही टिका केली. काय आहे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया…

खरं तर, सोमी अली (somy ali) हिने सलमान खान (salman khan) याच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता तिला गुलाब देताना दिसत आहे. यासोबत सोमीने लिहिले की, “अजून बरेच काही व्हायचे आहे. माझ्या शोवर भारतात बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर वकिलांनी मला धमक्या दिल्या. तू भित्रा आहेस माझ्या रक्षणासाठी 50 वकील उभे राहतील, जे मला सिगारेटचे चटके देण्यापासून आणि वर्षानुवर्षे माझ्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापासून वाचवतील.”

salman-khan

सोमी अलीने आपला मुद्दा पुढे करत अभिनेत्रींवर निशाणा साधत म्हटले की, “महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषाचे समर्थन करणाऱ्या सर्व अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे. मला लाज वाटते ज्या कलाकारांनी त्याचे समर्थन केले.” सोमी अलीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत हाेती. मात्र, काही वेळाने अभिनेत्रीने तिची पाेस्ट हटवली.

सोमी अलीने सलमान खानवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘मैने प्यार किया’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले हाेते की, “त्यांची पूजा करणे बंद करा.” यासोबतच तिने सलमान खानचे नाव न घेता त्याच्यावर मारहाणीचा आरोपही केला होता.

सोमी अली आणि सलमान खान 90 च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही अनेक जाहिरातींमध्ये एकत्र दिसले होते, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ती अमेरिकेत शिफ्ट झाली.(bollywood actor salman khan ex girlfriend somy ali alleged him said he beated several women)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी
‘मोहब्बत तो हम तेरी…’ प्रिया बापटची ‘ती’ पाेस्ट चर्चेत

हे देखील वाचा