Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड बंगालींवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे अभिनेत परेश रावल अडचणीत; पोलिसांनी दाखल केली एफआयआर

बंगालींवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे अभिनेत परेश रावल अडचणीत; पोलिसांनी दाखल केली एफआयआर

ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांच्यावराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माेहम्मद सलीम यांनी परेश रावल यांच्याविराेधात शुक्रवारी (दि. 2 डिंसेबल)ला पाेलिसांत तक्रार दाखल केली. रावल यांचे वक्तव्य प्रक्षोभक असून दंगल भडकवू शकते असा आरोप माेहम्मद सलीम यांनी केला. तसेच बंगाली आणि इतर समुदायांमधील एकोपा नष्ट करू शकतो. असे त्यांचे म्हणणे हाेते.

माेहम्मद सलीम यांनी तक्रारीत म्हटले आहे की, “मोठ्या संख्येने बंगाली राज्याच्या हद्दीबाहेर राहतात. मला भीती वाटते की, परेश रावल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यापैकी बरेच लोकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण हाेऊ शकते.” परेश रावल यांच्या विराेधात आयपीसी कलम 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे), 153A (वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवणे), 153B (भाषिक किंवा वांशिक गटांचे अधिकार नाकारण्याचा प्रचार), 504 (शांतता भंग करण्याचा हेतू), 505 (सार्वजनिक गैरसोय करणारी विधाने) इत्यादी कलम लावून पाेलिसांनी गुन्हा नाेंदवला आहे.

भाजपच्या निवडणूक प्रचारादरम्यान परेश रावल म्हणाले होते की, “गॅस सिलिंडर महागले आहेत, तर किंमती कमी होतील. लोकांना रोजगारही मिळेल, पण जेव्हा रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी दिल्लीसारखे तुमच्या जवळ राहू लागतील तेव्हा काय होईल. गॅस सिलेंडरचे काय कराल? बंगालींसाठी मासे शिजवणार का?” गुजरातचा उल्लेख करून रावल पुढे म्हणाला की, “येथील जनता महागाई सहन करू शकते, पण हे नाही. परेश रावल यांच्या या वक्तव्यावरून वाद सुरू झाला होता. मात्र, नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली हाेती.

परेश रावल यांच्या चित्रपट काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘संजू’, ‘तुफान’, ‘हंगामा 2’, ‘भुल भुलैया’, ‘ओह माय गॉड’ यासारखी दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिली. (bollywood actor paresh rawal fish remark on bengalis actor faces police case)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दुःखद! अभिनेत्री कर्स्टी ऍली यांचे निधन, वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बिग ब्रेकींग! ज्येष्ठ रंगकर्मी माेहनदास सुखटणकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा