Thursday, March 28, 2024

ज्येष्ठ रंगकर्मी माेहनदास सुखटणकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ रंगकर्मी माेहनदास सुखटणकर यांचे आज म्हणजेच मंगळवारी (दि. 6 नाेव्हेंबर)ला निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी माेहनदास यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ कलाकारानी गाेवा हिंदू असाेसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. माेहनदास यांनी ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ संस्थेच्या अगाेदर कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर अभिनेत्यांनी कार्यकर्ता म्हणून काम केले.

मोहनदास सुखटणकर (Mohndas Sukhtankar) मुळचे गोव्याचे होते त्यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 राेजी झाला. अभिनेत्याचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. श्रीपाद सुखटणकर यांनी सामाजिक कार्य म्हणून वैद्यकीय सेवा केली. अभिनेते शाळेत शिकत असताना इयत्ता दुसरीमध्ये त्यांनी पहिल्यांदारच एका छाेट्या नाटकात भूमिका साकारली. या नाटकाचे नाव ‘खोडकर बंडू’ असे हाेते. या नाटकासाठी माेहनदास यांचे सर्वत्र काैतुक झाले आणि या नाटकामुळेच त्यांना नाटकाची गाेडी लागली. यानंतर अभिनेत्यानी रंगभूमी हेच आपले दैवत मानले आणि नोकरी सांभाळून आयुष्यभर ‘कलावंत कार्यकर्ता’ म्हणून मराठी चित्रपटात काम केले.

माेहनदास यांनी ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ संस्थेच्या अगाेदर कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर अभिनेत्यांनी कार्यकर्ता म्हणून काम केले. माेहनदास यांनी ‘कैवारी’,’रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका, प्रेमांकुर’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘निवडुंग’ यासारख्या प्रसिद्धा मराठी चित्रपटातकाम केले आहे.(Senior actor Mohndas Sukhtankar passed away)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दुःखद! अभिनेत्री कर्स्टी ऍली यांचे निधन, वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
माेठी बातमी! ‘इमली’ फेम अभिनेत्रीचा अपघात, शूटिंगवरून घरी परतत असताना ट्रकने घासत नेली कार

हे देखील वाचा