Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड काय सांगता! 90 कोटींच्या कर्जात बुडाले होते बीग बी अमिताभ, परेश रावलाने केला मोठा खुलासा

काय सांगता! 90 कोटींच्या कर्जात बुडाले होते बीग बी अमिताभ, परेश रावलाने केला मोठा खुलासा

मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटांपासून ते छोट्या-छोट्या गोष्टींपर्यंत चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांचे चाहते देश-विदेशात पसरलेले आहेत, जे त्यांचे कौतुक करताना थकत नाहीत. पण यावेळी बिग बींचे कौतुक कोणत्याही चाहत्याने नाही तर इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार परेश रावल यांनी केले आहे. अलीकडेच परेश रावल यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांचे कौतुक करताना म्हटले की, स्टारडम असूनही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

खरं तर, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत परेश रावल (paresh rawal) यांनी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या स्टारडमची आणि त्यांच्या मानवतेची प्रशंसा केली. या मुलाखतीत अभिनेत्याने अमिताभ यांच्यावर 90 कोटींचे कर्ज असताना त्यांनी त्यांची परिस्थिती सन्मानाने कशी हाताळली हे देखील सांगितले.

परेश रावल यांनी सांगितले की, “सण 1999 मध्ये अमिताभ बच्चन यांची कंपनी ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ कर्जबाजारी झाली होती, ज्याचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे त्यांच्यावर 90 कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज होते. या दरम्यान, अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’चे होस्ट म्हणून परतले. इतकंच नाही, तर त्यांचा ‘मोहब्बतें’ हा चित्रपटही यशस्वी ठरला, त्यामुळे त्यांची अवस्था सुधारली आणि वेळेत ते मोठ्या कर्जातून बाहेर पडू शकले. अमिताभ बच्चन यांच्याबाबत असे कधी घडू शकते, असे कुणाला वाटले होते का? ते काय होते आणि काय बनले आहे… त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपण त्यांच्याकडून खूप काही शिकू शकताे

, विशेषतः प्रतिष्ठेबद्दल.”

आपला मुद्दा पुढे करत ते म्हणाला, “मला आठवतं मी त्याला एकदा याबद्दल विचारलं होतं. मी त्याला विचारले की, जेव्हा गोष्टी खूप कठीण होतात तेव्हा त्याचा त्याच्या कुटुंबावर विश्वास आहे का? आणि ते म्हणाले, ‘का? त्यांना त्याचं आयुष्य जगू द्या.’ बघा, अमिताभवर लोकांचे खूप पैसे होते, पण त्यांनी कधीही कोणाचे वाईट केले नाही. तो कायद्याच्या मागे लपून, सूट मिळवू शकत हाेता, परंतु त्याने सर्वांना परतफेड करणे निवडले. ही आहेत बिग बींची मूल्ये. शेवटी तो हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहे.”

अमिताब बच्चन यांच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर अलीकडेच ते ‘उंचाई’ या चित्रपटात दिसले हाेते.(bollywood actor paresh rawal says praises amitabh bachchan paid loan of rs 90 crore remembers big b struggling days)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
VIDEO | 25 लाख गमावले! टास्कदरम्यान सुंबुलवर चांगलीच संतापली अर्चना गौतम
नोरा फतेहीकडून तिरंग्याचा अपमान! फिफा वर्ल्डकपमध्ये काय केलं पाहाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा