Friday, December 6, 2024
Home बॉलीवूड दिल्ली पोलिसांनी ‘हेरा फेरी’चा हा मजेशीर व्हिडिओ केला शेअर, परेश रावल यांनी दिली प्रतिक्रिया

दिल्ली पोलिसांनी ‘हेरा फेरी’चा हा मजेशीर व्हिडिओ केला शेअर, परेश रावल यांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस लोकांना जागरूक करण्यासाठी विविध मोहिमा राबवतात. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर लाेकांना जागरूक करण्याची अनेक मोहीम राबवल्या जात आहे. विशेष म्हणजे जनजागृती मोहिमेचा आवाका वाढवण्यासाठी चित्रपटांच्या मीम्सचा वापर केला जात आहे. सोशल मीडियावर पोलीस वेळोवेळी अशा पोस्ट करतात, ज्या युजर्सना जागरुक करण्यासाठी उपयाेगी ठरेल. सेलेब्स देखील या पोस्ट्सने प्रभावित झाले आहेत आणि त्या पाेस्टला री-शेअर आणि री-ट्विट करत आहेत.

अभिनेता परेश रावल (paresh rawal) यांनीही दिल्ली पोलिसांनी केलेले ट्विट रिट्विट केले आहे. या ट्विटद्वारे खोटे कॉल करून बँक डिटेल्स मागणाऱ्यांना टाळण्याचा मार्ग सांगण्यात आला आहे. या ट्विटमध्ये दिल्ली पोलिसांनी अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या 2000 साली आलेल्या ‘हेरा फेरी’ (hera pheri) या सुपरहिट चित्रपटाची क्लिप वापरली आहे. या क्लिपमध्ये परेश रावलचे बाबूरावचे पात्र आणि राँग नंबर असलेला एक काॅल अशी मजेदार घटना पाहायला मिळत आहे.

दिल्ली पोलिसांनी यात थोडा ट्विस्ट दिला आहे. व्हिडिओमध्ये कारच्या बोनेटवर ठेवलेला टेलिफोन वाजल्याचे दिसत आहे. दिनेश हिंगूचे पात्र साकारणारा चमनला झिंगा काॅल करताे आणि बाबुराव फाेन उचलताे. दिल्ली पोलिसांनी ही फसवणूक असल्याचे म्हटले आहे. चमन फसवणुकीला कॉल करतो आणि म्हणतो, “सर, तुम्हाला 12 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तुम्हाला हे बक्षीस हवे असल्यास, संदेशासह पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा.

परेश रावल यांनी व्हिडिओ केला री-ट्विट
यानंतर बाबुरावचा मूळ संवाद ऐकायला येतो, “ बघून नंबर डायल कर .. ठेव.” हा मजेशीर व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. स्वत:ह परेश रावल यांनाही हे आवडले आहे. त्यांनी हात जाेडलेल्या इमोजीसह ते पुन्हा ट्विट केले आणि लिहिले, “खरे आणि अचूक.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संपली प्रतीक्षा! ‘पुष्पा: द रूल’मधील अल्लू अर्जुनचा खास लूक आला समोर
तेजस्वी प्रकाशचा अप्सरा लूक

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा