Sunday, October 26, 2025
Home बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बर अजूनही करतो आई स्मिता पाटील यांच्यावर प्रेम, छातीवरील टॅटूने चाहते भावुक

अभिनेता प्रतीक बब्बर अजूनही करतो आई स्मिता पाटील यांच्यावर प्रेम, छातीवरील टॅटूने चाहते भावुक

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर हा त्याच्या अभिनयाने नेहमीच सगळ्यांचे मन जिंकून घेत असतो. सोबतच त्याच्या स्टाईलने तर त्याचे चाहते त्याच्या प्रेमात पडत असतात. तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. प्रतिकने पुन्हा एकदा त्याच्या टॅटूने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने त्याच्या आईचा म्हणजेत दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या नावाचा टॅटू बनवून घेतला आहे. या टॅटूचा एक फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा टॅटू बघून त्याचे चाहते भावुक झाले आहेत.

प्रतीक बब्बर (pratik babbars) याने त्याच्या कुत्र्यासोबत एक फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बघू शकता की, त्याने त्याच्या छातीवर त्याच्या आईचे नाव स्मिता आणि त्यांच्या जन्माचे वर्ष लिहिले आहे. सोबतच त्याने इन्फिनिटीचे साईन काढले आहे. त्याने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “माझ्या आईच्या नावाचा टॅटू आहे. स्मिता फॉरएवर 1995.”

त्याच्या या पोस्टवर सोशल मीडियावर अक्षरशः लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेकांनी याच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

स्मिता पाटील यांचा मृत्यू प्रतीकच्या जन्मानंतर काही काळाने झाला होता. त्यांना मेंदूचे इन्फेक्शन झाले होते. त्यांच्या मृत्युनंतर प्रतीकचे पालन पोषण त्याच्या आजीने केले होते. प्रतीकला वयाच्या 12 व्या वर्षी ड्रग्जची सवय लागली होती. त्याने सांगितले होते की, “माझ्या वडिलांकडे माझ्यासाठी वेळ नसायचा. त्यावेळी सगळेजण मला माझ्या आईच्या यशाबद्दल सांगायचे. तेव्हा मला असे वाटायचे की, माझी आई माझ्यासोबत का नाहीये?? त्यानंतर मला ड्रग्जची सवय लागली. एवढंच नाही तर मी अगदी मरणाच्या उंबरठ्यावर उभा होतो.”

प्रतीकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच मधूर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो प्रवासी मजुरांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात 2020 मध्ये लागलेल्या लॉकडाऊन मधील स्थिती दाखवण्यात येणार आहे. यामध्ये प्रवासी मजुरांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागेल आहे. या बाबत संपूर्ण कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. बॉम्बे टाईम्ससोबत बोलताना त्याने सांगितले की, “मी ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात प्रवासी मजुरांच्या भूमिकेत दिसणार आहे. माझ्यासाठी ही एक सन्मानाची गोष्ट आहे की, मधूर सरांनी मला हा रोल दिला. या चित्रपटात काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” (bollywood actor pratik babbars tatto viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘कॅज्युअल सेक्स’ला योग्य मानतो प्रतीक बब्बर; म्हणाला, ‘मीही केलाय प्रयत्न’

आईच्या निधनानंतर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या प्रतीक बब्बरने काढून टाकले होते वडिलांचे आडनाव

हे देखील वाचा