Saturday, July 27, 2024

आईच्या निधनानंतर अं’मली पदार्थांच्या आहारी गेलेल्या प्रतीक बब्बरने काढून टाकले होते वडिलांचे आडनाव

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन या क्षेत्रात पदार्पण केले. काहींना त्यांच्या आईवडिलांप्रमाणे यश मिळवता आले नाही, तर काहींनी त्यांच्या आईवडिलांपेक्षा जास्त यश मिळवले. सिनेसृष्टीत असणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये प्रतीक बब्बर याने त्यांचे वेगळेपण सिद्ध केले आहे. कमी चित्रपटांमध्ये काम करूनही प्रतीक इंडस्ट्रीमध्ये एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. आज (13 नोव्हेंबर) प्रतीक त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

प्रतीकच जन्म 28 नोव्हेंबर, 1986 रोजी अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते राजकीय नेते राज बब्बर यांच्या पोटी झाला. त्याच्या जन्मावेळी काही समस्या निर्माण झाल्याने स्मिता पाटील यांचा प्रतीकच्या जन्मानंतर काही काळातच मृत्यू झाला. प्रतीकचे सर्व पालनपोषण स्मिता पाटील यांच्या आई-वडिलांनी केले. प्रतीक आणि राज बब्बर यांचे सुरूवातीला तणावपूर्ण संबंध होते. कारण राज हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या कुटुंबासोबतच व्यस्त होते. मात्र, प्रतीक मोठा होत गेला तसे त्यांचे संबंध सुधारले गेले.

प्रतीक त्याच्या आईच्या निधनामुळे प्रतीक खूपच तणावात होता. त्याच्या जन्मावेळी स्मिता यांच्या शरीरात इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. आईच्या निधनानंतर प्रतीक त्या दुखत इतका बुडाला की, त्यातून आभारच येत नव्हता, यातच त्याला अं’मली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन लागले. त्याची ही सवय इतकी वाढली की ती सोडवण्यासाठी त्याला व्यसन मुक्ती केंद्रात पाठवण्यात आले. तिथे त्याने मोठ्या संघर्षाने त्याची ही सवय सोडली.

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर प्रतीक राज बब्बर यांच्यापासून दुरावले गेले. प्रतीक वडिलांवर खूप नाराज होता. प्रतिकने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “राज बब्बर यांच्याकडे माझ्यासाठी अजिबात वेळ नव्हता. माझ्या आईवडिलांबद्दल मला लोकं अनेक गोष्टी सांगायचे. त्याच माझ्या डोक्यात पक्क्या बसल्या होत्या. मी माझ्या वडिलांचा एवढा तिरस्कार करू लागलो की त्यांचे आडनाव देखील काढून टाकले.”

मात्र आता प्रतीक आणि राज बब्बर यांचे नाते सुधारले असून, तो राज यांच्या पत्नीसोबत आणि त्यांच्या भावांसोबत खूप चांगला बॉन्ड शेअर करतो. नेहमी तो या सर्वांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो.

प्रतिकने 2008 साली ‘जाने तू या जाने ना’ सिनेमातून जिनिलियाच्या भावाची भूमिका करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला यातून अपेक्षित ओळख मिळाली नाही. या सिनेमानंतर ‘एक दीवाना था’,’धोबी घाट’, ‘आरक्षण’, ‘माय फ्रेंड पिंटो’, ‘मुल्क’, ‘यारम’, ‘दरबार’, ‘बागी 2’, ‘छिछोरे’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यातले काही सिनेमे फ्लॉप तर काही हिट झाले. 23 जानेवारी 2019 ला प्रतीक बब्बरचं लग्न सान्या सागरसोबत अगदी पारंपारिक पद्धतीने आणि धूमधडाक्यात झालं होतं. त्यांच्या हाय प्रोफाईल लग्नाला अनेक सेलिब्रिटीज आणि राजकारणी यांची उपस्थिती होती. (birthday special prateik babbar addicted to drugs drop his fathers surname)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भांड फुटलं रे! लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला विकी देणार कॅटरिनाला ‘हे’ भन्नाट सरप्राईज

काय सांगता! नाेराची प्रेमात झाली फसवणूक, भावूक हाेऊन सांगितली दु:खद कहाणी

हे देखील वाचा